Share

प्रसिद्ध अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा; म्हणाली, माझ्या मुलीने डेटींग ऍपवर माझं अकाऊंट उघडलं अन्…

प्रसिद्ध कलाकारांचे मुलं मुली वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असतात. आता सध्या सुचित्रा कृष्णमूर्ती यांची मुलगी कावेरी कपूर चांगलीच चर्चेत आली आहे. सुचित्रा यांनी कावेरीबद्दल एक हैराण करणारा खुलासा केला आहे. जो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. (suchitra krushnamurti on dating app)

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सुचित्रा कृष्णमूर्ती म्हणाल्या की, एकल पालक म्हणून ती आपल्या मुलीशी अजिबात कठोर नव्हती. तसेच एकवेळ अशी आली होती की कावेरीने तिला डेटिंग ऍपवर अकाऊंट उघडण्यास भाग पाडले होते आणि तिच्या आनंदासाठी तिने ते सुद्धा केले होते.

सुचित्रा कृष्णमूर्ती म्हणाल्या की, एकल पालक असल्यामुळे तिच्याकडून कोणतीही चुक होऊ नये यासाठी ती पुर्णपणे काळजी घेत होती. ती म्हणाली की कावेरीने एका डेटिंग ऍपवर सुचित्राची प्रोफाइल तयार केली होती. तसेच तिला डेटवर जाण्यास भागही पाडले गेले, जे तिला अजिबात आवडत नव्हते.

अकाऊंट उघडल्यानंतर काही डेटवर मी गेले होते, पण त्यानंतर मी त्या सर्व गोष्टी संपवल्या. तसेच आता माझ्या आयुष्यातील अनुभव आणि माझ्यासोबत घडलेल्या गोष्टी मी एका पुस्तकातून मांडण्याचा विचार करत आहे, असेही सुचित्रा कृष्णमूर्तीने म्हटले आहे.

सुचित्राने सांगितले की, माझी मुलगी कावेरीने काही काळापूर्वी मला एका डेटिंग साइटवर ऍड केले. त्यानंतर तिने मला डेटवर जाण्यास सांगितले. माझी कोणत्याही डेटवर जाण्याची इच्छा नव्हती. पण तिने खुप हट्ट केला, त्यामुळे मला काही डेटवरही जावे लागले. पण नंतर मी तिला या गोष्टीसाठी स्पष्टपणे नकार दिला.

सुचित्रा कृष्णमूर्ती आणि शेखर कपूर यांनी १९९७ मध्ये लग्न केले आणि २००६ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. अभिनेता आणि चित्रपट निर्मात्याची कावेरी कपूर ही मुलगी आहे, जी व्यवसायाने गायिका आहे. ती लवकरच हिंदी चित्रपटांतून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे.

महत्वाच्या बातम्या-
वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पंढरपूर यात्रेनिमित्त अनिल परबांची मोठी घोषणा
एका चुटकीत ३०० कोटी कमवू शकतो, तेव्हा त्यांना वाटायचे बाता मारतोय, पण आता ते खरं झालय
PHOTO: जॅकलीनने पोस्ट केला विचित्र सेल्फी, तिच्या फाटलेला ब्रावरच लोकांच्या खिळल्या नजरा

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now