भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी हे त्यांच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. आता त्यांच्याच एका वक्तव्याचा दाखला देत शिवसेनेचे मुखपत्र सामनामधून नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. नरेंद्र मोदींना २०२४ च्या निवडणूकीपूर्वीच पदावरुन पाय उतार व्हावे लागेल, या भाकिताकडे संजय राऊतांनी लक्ष वेधलं आहे.
सुब्रमण्यम स्वामी हे हवेत तीर मारणारे नेते नाहीत. जगभरातील यंत्रणांशी त्यांचा संवाद आहे. त्यामधून ही माहिती समोर आली आहे. द गार्डियनने प्रसिद्ध केलेली हेरगिरी आणि निवडणूक हेराफेरीची माहिती व डॉ. स्वामी यांनी केलेला नवा गौप्यस्फोट यामुले अनेक राजकीय घटना घडतील, असे सामनातून म्हटले आहे.
तसेच गार्डियन वृत्तपत्रामध्ये अनेक गौप्यस्फोट करण्यात आले आहे. २०२३ च्या मध्यात वॉशिंग्टनमधून अनेक धक्कादायक खुलासे होतील. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपल्या पदावरुन पायउतार व्हावे लागेल, असे सामनामधून संजय राऊतांनी म्हटले आहे.
आज नरेंद्र मोदींच्या लोकप्रियेत ओहोटी लागल्याची चर्चा आहे. अदानी प्रकरणानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवरील नरेंद्र मोदी यांची पत घसरली आहे. मोदींची लोकप्रियता केवळ फुगा आहे. लोकशाहीचा मुखवटा घालून ते हुकूमशाही चालवत आहे, असे सामनामध्ये म्हटलेले आहे.
सामनामध्ये संजय राऊतांनी काय म्हटले आहे?
द गार्डियन वृत्तपत्राने अनेक या संदर्भात अनेक गौप्यस्फोट केले आहे. त्याच्यानुसार, विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी त्यांच्यावर पाळत ठेवली जात आहे. विरोधकांना शरण आणण्यासाठी इस्त्रायलमधील एका कुख्यात डिटेक्टिव्ह कंपनीची भारतात मदत घेतली जात आहे. ही कंपनी कोणत्याही थराला जाऊ शकते.
ही कंपनी सोशल मीडियाच्या माध्यमातून धर्माधर्मांमध्ये द्वेष पसरवत आहे. या कंपनीने ईव्हीएम हॅक करुन भाजपच्या पराभवाचे रुपांतर विजयात केले आहे. भाजपचे नेते म्हणतात की आम्ही ४०० जागा जिंकू. याचा अर्थ समजून घेतला पाहिजे.
संजय राऊतांनी सुब्रमण्यम स्वामींच्या वक्तव्याचा दाखला दिला. सुब्रमण्यम स्वामींनी मागणी केली होती की, अजित डोवाल यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार या पदावरुन मोदींनी हकालपट्टी केली पाहिजे. त्यांचे एक प्रकरण लवकरच उघड होणार आहे. मोदींनी वेळेत पावले उचलली नाही, तर २०२३ च्या मध्यात त्यांना पंतप्रधानपरुन पायउतार व्हावे लागेल.
महत्वाच्या बातम्या-
एकनाथ शिंदेंनी शिवसेनेपाठोपाठ मनसेलाही पाडले भलेमोठे खिंडार; राज ठाकरेंचा खास शिलेदार फोडला
शिंदेंचा आनंद कितीवेळी टिकेल हे सांगता येणार नाही; कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम असे का म्हणाले?
शरद पवारांनी एका वाक्यातच काढली निवडणूक आयोगाच्या निकालाची हवा अन् वाढले भाजपचे टेंशन