निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापलेलं असतानाच दुसरीकडे सध्या देशात अग्निपथ योजनेवरून गदारोळ पसरला आहे. केंद्र सरकारने लष्करात भरतीसाठी आणलेल्या अग्निपथ योजनेला (Agneepath Yojana) देशातील अनेक भागांतून विरोध होताना दिसत आहे. याचे पडसाद देशभरात उमटले आहे.
मोदी सरकारच्या ‘अग्निपथ’ योजनेच्या विरोधात बिहार, उत्तर प्रदेश आणि हरियाणासह विविध राज्यांमध्ये शुक्रवारी हिंसक निदर्शने करण्यात आली. तसेच याच मुद्यावरून राजकारण देखील चांगलचं तापलं आहे. विरोधकांनी मोदी सरकारवर हल्लाबोल चढवला आहे.
याचाच धागा पकडत काँग्रेस नेत्याने अग्निपथ योजनेसंदर्भात बोलताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर खालच्या शब्दात टिका केली आहे. काँग्रेस नेत्याच्या वादग्रस्त विधानाने नव्या वादाला तोंड फुटणार असल्याच बोललं जातं आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुबोध कांत सहाय यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.
जंतर-मंतरवरील काँग्रेसच्या सत्याग्रहावेळी सुबोध कांत सहाय यांनी मोदींवर जहरी टिका केली आहे. तसेच त्यांनी केलेल्या विधानावरुन राजकीय वर्तुळात मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदी हे हिटरच्या पाऊलावर पाऊल टाकत असल्याच त्यांनी म्हंटलं आहे.
सुबोध कांत सहाय यांनी मोदींवर टीका करताना म्हंटलं आहे की, ‘मोदी हिटलरच्या वाटेवर चालले तर हिटलरप्रमाणे त्यांचाही मृत्यू होईल’, असं वादग्रस्त व्यक्तव्य सहाय यांनी यावेळी बोलताना केलं आहे. सुबोध कांत सहाय यांनी केलेल्या व्यक्तव्यानंतर त्यांच्यावर टीकेचा भडिमार होतं आहे.
दरम्यान, या योजनेवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही टीका केली. ‘केंद्राला तीन कृषी कायद्यांसारखंच ही योजनाही मागे घ्यावी लागेल,’ असं म्हणत राहुल गांधींनी म्हंटलं होतं. सध्या अग्निपथ योजनेवरून गदारोळ पसरला असून राजकीय वर्तुळात देखील त्याचे पडसाद उमटत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
PHOTO: अनुराग कश्यपच्या मुलीने बॉयफ्रेंडसोबतचे ‘ते’ इंटिमेट फोटो केले शेअर, म्हणाली, कायम तुझ्यासोबत…
एक एक मत महत्वाचे, कॅन्सरशी झुंज देणाऱ्या मुक्ता टिळक व्हिलचेअरने विधान भवनात दाखल
सलमानपासून ते राणी मुखर्जीपर्यंत सर्व स्टार्स होते अंडरवर्ल्डच्या मुठीत, पण ‘ही’ अभिनेत्री त्यांना पुरून उरली
अग्निपथ योजना बंद होणार नाही, आंदोलक अग्निवीर होणार नाहीत, डिफेंस अधिकारी आपल्या मतावर ठाम