Share

झुंड पाहून सुबोध भावेने दिली हैराण करणारी प्रतिक्रिया; म्हणाला, “नागराज तु आमच्या पिढीचा…”

मागील अनेक दिवसांपासून मराठी चित्रपटसृष्टीत अनेक नवनवीन कथा घेऊन चित्रपट येत आहेत. अनेक चित्रपटांनी चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे. काही दिवसांपूर्वीच एक चित्रपट आला होता. जो सर्व सामान्य लोकांच्या अगदी जवळ होता. या चित्रपटातील गाणे देखील सुपरहिट ठरले आहेत. तो म्हणजे म्हणजे ‘सैराट.’ सैराट या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता.

या चित्रपटानंतर काही दिवसांतच त्यांचा ‘झुंड’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन हे प्रमुख भूमिका साकारत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून नागराज मंजुळे हे दिग्दर्शक म्हणून बॉलिवूडमध्ये पदापर्ण करत आहेत.

याच कारणासाठी अभिनेता सुबोध भावेने नागराज मंजुळेंना शुभेच्छा दिल्या आहेत. सुबोधने आपल्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने नागराज यांना याबाबत शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी सुबोधनी ‘झुंड’ चित्रपटाचे एक पोस्टर शेअर केले आहे. तसेच त्याने हटके कॅप्शन देखील दिले आहे. तसेच सुबोध सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असतो.

त्याने कॅप्शन लिहिले की, “नागराज तुझ्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा उद्या तू गाठतोयस. आमच्या पिढीचा तू एक महत्त्वाचा दिग्दर्शक आहेस. तुझ्या प्रत्येक चित्रपटाची उत्सुकता नेहमीच असते. ४ मार्च रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘झुंड’ या तुझ्या पहिल्या हिंदी चित्रपटासाठी तुला मनपूर्वक शुभेच्छा.”

तसेच सुबोधने टाळ्या वाजवतानाचा इमोजीही शेअर केला आहे. या पोस्टमध्ये त्याने नागराज मंजुळेंना टॅगही केले आहे. दरम्यान त्याची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. चाहत्यांकडून या पोस्टला लाइक्स आणि कमेंट्स करत आहेत.

खरतर ‘झुंड’ हा चित्रपट स्लमसॉकरचे संस्थापक विजय बरसे यांच्या आयुष्यावर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केले आहे. ‘झुंड’ हा चित्रपट आज ४ मार्चपासून चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासह आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरु हे देखील आहेत.

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now