Share

Indian Idol: इंडियन आयडलमधील स्पर्धकाच्या आवाजावर फिदा झाले सुभाष घई, देऊन टाकली थेट ‘ही’ ऑफर

Indian Idol, Neha Kakkar, Subhash Ghai, Vishal Dadlani/ जगातील प्रसिद्ध सिंगिंग रिअॅलिटी शो इंडियन आयडॉल (Indian Idol) देशभरात धुमाकूळ घालत आहे. हा शो लोकांचे प्रचंड मनोरंजन करत आहे. नेहा कक्करमुळे (Neha Kakkar) या शोला प्रचंड ट्रोल केले जात असताना, गायन जगतातील टॉप 15 स्पर्धकांच्या आवाजाने प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक सुभाष घई (Subhash Ghai) यांचे मन जिंकले आहे. तसेच सुभाष घईही एका गायकाच्या आवाजाच्या प्रेमात पडले आणि स्पर्धकाला चित्रपटाची ऑफर दिली.

नुकताच इंडियन आयडॉलचा एक एपिसोड प्रसारित झाला. यावेळी विशाल ददलानी, नेहा कक्कर आणि हिमेश रेशमिया हे तीन जजच नाही तर फिल्मी जगतातील काही बड्या हस्तीही उपस्थित होत्या. ‘इंडियन आयडॉल 13’ मधील ‘द ड्रीम डेब्यू’मध्ये इस्माईल दरबार, जावेद अली, अरमान मलिक, जतिन पंडित, सुभाष घई, अरुणा इराणी, मंदाकिनी यांच्यासह अनेक बड्या व्यक्तींनी स्पर्धकांचे मनोबल वाढवले.

यादरम्यान सुभाष घई यांनी कोलकाताहून आलेल्या बिदिप्ता चक्रवर्ती हिला अशी गोष्ट सांगितली, जी ऐकून तिथे उपस्थित असलेले सर्वजण आश्चर्यचकित झाले. बिदिप्ताचा मधुर आवाज, तिच्या चेहऱ्यावरचा निरागसपणा आणि दिसण्याने सुभाष घईंची मने जिंकली. बिदिप्ता चक्रवर्तीच्या गायनाने आणि तिच्या सौंदर्याने प्रभावित होऊन सुभाष घई यांनी गायिकेला नायिका बनण्याची ऑफर दिली.

सुभाष घई बिदिप्ताला म्हणाले, तुला नायिका व्हायला आवडेल का? हे ऐकून बिदिप्ता स्तब्ध झाली आणि तिथे बसलेले सर्व लोकही स्तब्ध झाले. यावेळी सुभाष घई म्हणाले की, अनेकवेळा त्यांच्या आतून आवाज येतो आणि ते तसे करतात. कधी कधी ते चुकीचा असतात, पण अनेकदा ते बरोबरही असतात.

सुभाष घई म्हणाले की, बिदिप्ताला पाहिल्यानंतर आतून आवाज आला असून, तिला चित्रपटात नायिका म्हणून कास्ट करावे, असे वाटते. जुना किस्सा आठवून सुभाष घई म्हणाले की, त्यांनी जॅकी श्रॉफ आणि महिमा चौधरी यांनाही त्यांच्या चित्रपटाची ऑफर दिली होती, त्यांनाही धक्का बसला होता आणि आज ते जे काही करत आहेत ते सर्वांसमोर आहे.

 

 

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now