Rahul Jain, Rape, Stylist,/पंकज त्रिपाठी स्टारर ‘कागज’ आणि ‘जुग जुग जियो’ सारख्या चित्रपटांमध्ये गाण्यांना आवाज देणारा गायक राहुल जैन (Rahul Jain) याच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. एका फ्री-लान्स कॉस्च्युम स्टायलिस्टने मुंबईतील ओशिवरा पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केला आहे. 30 वर्षीय स्टायलिस्टने आरोप केला आहे की, राहुलने तिला मुंबईतील फ्लॅटमध्ये बोलावून तिच्यावर बलात्कार केला आहे.
दुसरीकडे, सिंगरने हे आरोप खोटे आणि निराधार असल्याचे म्हटले आहे. ओशिवरा पोलिस स्टेशनमध्ये नोंदवलेल्या जबाबात राहुलने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून तिच्याशी संपर्क साधून तिच्या कामाचे कौतुक केल्याचे म्हटले आहे. स्टायलिस्टच्या एफआयआरचा संदर्भ देताना एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, राहुलने तिला त्याच्या अंधेरी फ्लॅटवर येण्याचे आणि तिला आपला पर्सनल स्टायलिस्ट बनवण्याचे आमंत्रण दिले.
एफआयआरनुसार, महिला 11 ऑगस्ट रोजी राहुल जैन यांच्या फ्लॅटमध्ये गेली होती. राहुलने तिला सामान दाखवण्याच्या बहाण्याने आपल्यासोबत बेडरूममध्ये येण्यास सांगितले आणि त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. स्टायलिस्टने पोलिसांना असेही सांगितले होते की, जेव्हा तिने तिच्यावर होत असलेल्या गुन्ह्याचा निषेध केला तेव्हा राहुलने तिच्यावर हल्ला केला आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 376 (बलात्काराची शिक्षा), 323 (हेतूपूर्वक दुखापत करण्यासाठी शिक्षा) आणि 506 (गुन्हेगारी धमकीची शिक्षा) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मात्र, याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
एका इंग्रजी न्यूज वेबसाईटच्या वृत्तानुसार, राहुलने स्पष्टीकरण दिले की, मी त्या महिलेला ओळखत नाही. तिने केलेले आरोप निराधार आणि खोटे आहेत. याआधीही एका महिलेने माझ्यावर असेच आरोप केले होते, पण मला न्याय मिळाला. हे असू शकते की ही महिलाही त्या महिलेशी सामील झाली असेल.
आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, गेल्या वर्षी एका गीतकार आणि लेखिकेने राहुल जैन यांच्याविरोधात बलात्कार, जबरदस्ती गर्भपात आणि फसवणूक या कलमांखाली एफआयआर दाखल केला होता. मूळचा इंदूरचा राहणारा राहुल जैनने 2016 मध्ये ‘फिव्हर’ चित्रपटातील ‘तेरी याद’ गाण्याद्वारे गायनात पदार्पण केले. त्यांनी 250 हून अधिक म्युझिकल ट्रॅक तयार केले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
Gujrat riots : गुजरात दंगल: बिल्किस बानो बलात्कार प्रकरणातील 11 दोषींची 15 ऑगस्टला सुटका
Rape Case: हनुमान गडाचे मठापधिपती खाडे महाराजांवर बलात्काराचा गुन्हा दाखल; पीडिता म्हणाली, त्यांनी मला
Bangladesh: चालत्या बसमध्ये केला महिलेवर बलात्कार, प्रवाशांना पडद्याने ठेवले बांधून, वाचून थरकाप उडेल
Rape Case: बलात्कारातून जन्मलेल्या मुलाने २७ वर्षांनी शोधली स्वतःची खरी आई; जन्मदात्या बापाचाही घेतला सूड