Share

‘आम्हाला काहीच नको फक्त येथून बाहेर काढा’, पाणावलेल्या डोळ्यांनी पुण्यातील विद्यार्थ्याने सांगितली आपबीती

युक्रेन आणि रशियामध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना तसेच नागरिकांना मायदेशी परत आणण्यासाठी भारत सरकारने मिशन गंगा सुरु केले आहे. परंतु अद्याप सरकारला संपूर्ण नागरिकांना मायदेशी परत आणण्यामध्ये यश आलेले नाही. अजून कित्येक नागरिक आणि विद्यार्थ्यी युध्दाच्या स्थितीत वेगवेगळ्या भागात अडकून बसले आहे.

यामध्ये पुण्याचा विद्यार्थी आकाश हिंगे सुध्दा आहे. आकाश सध्या या युध्दजन्य स्थितीत अडकून बसला आहे. त्यांने भारत सरकारला विनंती केली आहे की, ‘आम्हाला, खाणे नको, पाणी नको…फक्त आणि फक्त आम्हाला येथून बाहेर काढा. आम्ही, वैद्यकीय शिक्षणातील विद्यार्थी असून युद्धाला सामोरे जाण्यासाठी तयार नाही.

युद्धजन्य परिस्थिती असलेल्या भागात अडकून पडलो आहोत. आम्हाला येथून सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावे,’’ आकाश रशियाने हल्ला केलेल्या किव्हमध्ये अडकला आहे. या भागातून बाहेर पडण्यासाठी आकाश सर्व बाजूंनी प्रयत्न करत आहे. परंतु तरी देखील त्याला कोणताही मार्ग सापडत नाहीये.

चारी बाजूंनी रशियन सैन्य हल्ला करत आहे. त्यामुळे आपल्या पाणावलेल्या डोळ्यांनी आकाश आपली आपबिती सांगत आहे. त्यांने म्हटले आहे की, ‘‘आता किव्हमधील परिस्थिती खूप गंभीर झाली असून रशियन सैनिक सर्वत्र आहेत. काल रोमानियाला जाण्यासाठी बाहेर पडलेले काही विद्यार्थी रेल्वे स्टेशनपर्यंत पोचून शकले.

काहींना रेल्वेने जाता आले. तर काही विद्यार्थ्यांना माघारी पाठविण्यात आले. आम्हाला येथून बाहेर पडायचे आहे.’’ त्याचबरोबर ‘‘युक्रेनमधील वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणारे माझे काही मित्र गेल्या दोन दिवसांपासून युक्रेन-रोमानिया बॉर्डरवर अडकून पडले आहेत. तिथे जवळपास दोन ते तीन हजार भारतीय विद्यार्थी अडकले आहेत.

परंतु त्यांना सीमा पार करता येत नाहीये. हे विद्यार्थी गेल्या दोन दिवसांपासून खाण्या-पिण्याशिवाय तेथे आहेत.’’ अशी चिंताजनक माहिती आकाशने दिली आहे. युक्रेनमधील किव्ह, खारकीव, सुमी भागात हजारो भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. त्यांना परत मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारने ऑपरेशन गंगा ही मोहीम सुरू केली आहे. या सर्व भारतीय नागरिकांना युक्रेनच्या शेजारील देश हंगेरी आणि रोमानियामार्गे बाहेर काढले जात आहे.

महत्वाच्या बातम्या
‘झुंड’ची स्टोरी पाहून एका झटक्यात बिग बींनी कमी केली आपली फी; म्हणाले, माझ्यावर खर्च करण्यापेक्षा..
ऐतिहासिक शंभरावी कसोटी खेळण्यापुर्वीच विराट कोहलीला बसला मोठा धक्का, वाचा सविस्तर..
“संभाजीराजे पराभूत झाले, तेव्हापासून मी नवस मागणं बंद केलं होतं, पण यावेळी नवस केला कारण…”
भारतावर खुश असलेला रशिया आता भारतीय मिडीयावर झाला नाराज, दिल्या ‘या’ महत्वाच्या सुचना

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now