सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये काही शालेय विद्यार्थी बिअर पिताना दिसत आहेत. रिपोर्ट्सनुसार, हा व्हिडिओ तामिळनाडूच्या चेंगलपट्टू जिल्ह्यातील आहे, ज्यामध्ये विद्यार्थी चालत्या बसमध्ये बिअर पीत आहेत. (students-drinking-beer-in-a-moving-bus-inquiry-orders-after-video-goes-viral)
वृत्तानुसार, ही व्हिडिओ क्लिप एका विद्यार्थ्याने रेकॉर्ड(Record) केली आणि सोशल मीडियावर अपलोड केली आहे. हे सर्व विद्यार्थी चेंगलपट्टू येथील सरकारी शाळेतील असल्याचे सांगण्यात येत आहे. जेव्हा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला तेव्हा दावा करण्यात आला की हा व्हिडिओ बराच जुना आहे, मात्र नंतर ही घटना मंगळवारी घडल्याचे दिसून आले.
ही बातमी स्थानिक माध्यमांमध्येही दाखवली जात आहे. हे सर्व विद्यार्थी त्यांच्या शालेय गणवेशात थिरुकाझुकुंद्रमहून(Thirukazukundram) थचूरला जाणाऱ्या बसमध्ये होते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच राज्यात खळबळ उडाली आहे.
या घटनेबाबत जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, अधिकाऱ्यांनी या घटनेची दखल घेतली असून स्थानिक पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल.