Share

हिंदुस्तानी भाऊच्या सांगण्यावरून विद्यार्थ्यांनी शिक्षणमंत्र्यांच्या बंगल्याला घातला घेरा? पोलीस करत आहेत तपास

दहावी-बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घ्या या मागणीसाठी मुंबईसह अनेक ठिकाणी शेकडो विद्यार्थी अचानक रस्त्यावर उतरले .शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराला तर विद्यार्थ्यांनी घेराव घातला. अचानक एवढे विद्यार्थी आले कोठून याबद्दल सर्वत्र चर्चा होत असताना, हिंदुस्थानी भाऊच नाव समोर आलं. त्यामुळे आता नेमका हिंदुस्थानी भाऊ कोण आहे? कोठून आला? कुठल्या पक्षाशी संबंधित आहे असे अनेक प्रश्न सोशल मीडियासोबतच सरकारला देखील पडले आहेत.

एवढ्या साऱ्या विद्यार्थ्यांनी अचानक गर्दी केली, त्यामुळे पोलिसांना देखील सौम्य लाठीमार करावा लागला. या आंदोलनामुळे ठाकरे सरकारचे नक्कीच धाबे दणाणले असल्याचे बोलले गेले. मात्र, एवढ्या साऱ्या विद्यार्थ्यांचे नेतृत्व करतंय कोण असा प्रश्न अनेकांना पडला. चौकशी नंतर समजले की हिंदुस्थानी भाऊ या आंदोलनाचे नेतृत्व करत आहे.

माहितीनुसार, विद्यार्थ्यांचे आंदोलन पेटण्यापूर्वी काही वेळ आधी हिंदुस्थानी भाऊ तिथे आला होता. मात्र, पोलिसांनी त्याला लगेच तिथून बाहेर काढले. त्यामुळे नंतर तर आंदोलन अधिकच चिघळलं. आंदोलन अधिकच आक्रमक झालं होतं. त्यामुळे नेमका ‘हिंदुस्थानी भाऊ’ कोण याबद्दल सर्वांना उत्सुकता वाटत आहे.

तर, या हिंदुस्थानी भाऊचं नाव विकास जयराम फाटक आहे. हा बिग बॉस च्या सिझन 13 मध्ये दिसला होता. बिग बॉसचा भाग बनल्यानंतर त्याची लोकप्रियता खूप वाढली आहे. याव्यतिरिक्त तो एक टिकटॉक स्टार आणि सोशल मीडियावरील लोकप्रिय व्यक्ती आहे. इंस्टाग्रामवर तिचे अर्धा दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत.

या आंदोलनानंतर तो अधिकच प्रसिद्ध झाला. या आंदोलनानंतर विद्यार्थ्यांना भडकावल्याचा आरोप त्याच्यावर होत आहे. आंदोलनानंतर त्याने यावर प्रतिक्रिया दिली की,आज तीन महिने झाले विद्यार्थी वर्षा गायकवाड यांना सांगत आहेत. मात्र आजवर त्यांचा आवाज त्यांनी ऐकला नाही. त्यामुळे आज विद्यार्थ्यांनी माझ्या आवाहनाला प्रतिसाद दिला, तर त्यात मी वाईट झालो का? असा सवाल त्यांने केला.

तसेच मी कोणत्याही पक्षाशी किंवा संघटनेशी संबंधित नाही. केवळ विद्यार्थ्यांसाठी रस्स्यावर आलो आहे. सरकारनं जर विद्यार्थ्यांचं ऐकलं असतं तर आज ही वेळ आली नसती. तसेच, शिक्षण मंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्याचा इशारा देखील आपणच दिला होता,अशी कबुली देखील त्याने यावेळी दिली.

राजकारण

Join WhatsApp

Join Now