student write marriege essay | सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. कधी फोटो तर कधी व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. आता अशाच एका लहान मुलाचा निबंध सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याचा निबंध पाहून त्याचे शिक्षकही चक्रावले आहे.
असं म्हणतात की लहान मुलं जे कुटुंबात घडत असतं, तेच करत असतात. कुटुंबात ते जे काही पाहतात आणि ऐकतात तेच ते बोलतात. त्यामुळे त्यांची विचारसरणीही तशीच असते. म्हणूनच मुलांसमोर बोलताना वागताना घरातील सदस्यांनी विचार केला पाहिजे, असे म्हटले जाते.
आता सोशल मीडियावर एक निबंध व्हायरल झाला आहे ज्यामध्ये एका मुलाने लग्नाबद्दल आपले मत मांडले आहे. त्याने जवळपास पानभर लिहिले होते असले तरी त्याला त्याच्या शिक्षकाने शुन्य मार्क दिले आहे. तसेच त्याच्या खाली एक वाक्य सुद्धा लिहिलेले आहे.
निबंधात असे लिहिले आहे की, जेव्हा घरातील लोक मुलीला सांगतात की तू मोठी झाली आहेस आणि आम्ही तुझी काळजी घेऊ शकत नाही. आता तुला एक मुलगा शोध जो तुला खायला देऊ शकेल. मग मुलगी त्या मुलाला भेटते. दोघेही लग्न करतात. दोघेही एकमेकांना जाणून घेतात आणि राहायला लागतात.
ज्या मुलाचा हा निबंध व्हायरल झाला आहे, तो तिसरीचा विद्यार्थी आहे. शिक्षकाने विद्यार्थ्याला शून्य मार्क दिले आहेत. तसेच तिने मुलाला बावळट म्हटले आहे. पुढे तिने असे लिहिले आहे की, मला भेट. सध्या या लग्नाच्या निबंधाचा फोटो सोशल मीडियावर खुप व्हायरल होत आहे.
हे ट्विट srpdaa नावाच्या ट्विट वापरकर्त्याने शेअर केले आहे. हे ट्विट व्हायरल झाल्यानंतर यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहे. काहींनी म्हटले आहे की, या मुलाने तेच लिहिले आहे, जे त्याने घरात बघितले आहे. तर दुसऱ्या एका व्यक्तीने लिहिले आहे की, हे मुल खुपच भारी आहे, त्याला पुरस्कार दिला पाहिजे.
महत्वाच्या बातम्या-
Rohit Sharma : रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडला, ‘या’ खेळाडूने ४२ चेंडूत ठोकले नुसते चौकार आणि षटकार; केल्या २६८ धावा
health : सुहागरात्रीला ग्लासभर दूध पिण्याची प्रथा का आहे? यामागचे वैज्ञानिक कारण वाचून आश्चर्य वाटेल
Raj Thackeray : राज ठाकरेंनी निवडणूक न लढवताच जिंकली मने; सेनेला पाठिंबा देत फडणवीसांनाही केली ‘ही’ विनंती