आपला विद्यार्थी आपल्याकडून शिकून पुढे जाऊन मोठा झाल्यावर गुरूंना अभिमान वाटतो. अनेकदा आपणही आपल्या शिक्षकांना भेटायला जातो. असाच एक माजी विद्यार्थी ट्यूशन टीचरला भेटायला गेला, मात्र त्याने केलेले कृत्य वाचून तुम्हालाही जबर धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.
ही घटना चंडीगढमधली आहे. 9 वर्षांपूर्वी हा विद्यार्थी मेहता दाम्पत्याकडून ट्यूशन घेत होता. यापूर्वीही तो अनेकदा त्यांच्या घरी आला आहे. ते त्याला चांगलं ओळखतात. मिळालेल्या माहितीनुसार, त्या दिवशी तो आला तेव्हा त्याने शिक्षिकेकडून 1 लाख रुपयांची मागणी केली. त्यांनी नकार दिल्यानंतर त्याने हे टोकाच पाऊल उचलले, असे बोलले जात आहे.
चला तर जाणून घेऊ या.. नेमकं काय घडलं… गेल्या अनेक वर्षांपासून शिकवणी घेणारे दिव्यांग विनय मेहता आणि त्यांची पत्नी मुलांचे ट्यूशन क्लास घेतात. हा आरोप विद्यार्थी त्यांचा 9 वर्षापूर्वीचा माजी विद्यार्थी आहे. नेहमी तो आपल्या शिक्षकांना भेटण्यासाठी येत असतं.
नेहमीप्रमाणे तो गुरुवारी संध्याकाळी शिक्षकांच्या घरी आला होता. त्यांच्या गप्पा झाल्या, कॉपी झाली. काही वेळानंतर शिक्षिका तरुणाला बाहेर सोडायला गेली असता त्या विद्यार्थ्याने अचानक त्याने महिलेवर हल्ला केला. धक्कादायक बाब म्हणजे त्या विद्यार्थ्याने त्या दोघांना खोलीत बांधलं.
पुढे त्या तरुणाने स्वयंपाकघरातून चाकू आणला आणि त्यांच्यावर अनेकदा वार केले. महिलेने घातलेले सोन्याचे दागिने, घरातील कॅश घेऊन बाहेर टाळं लावून तो पळून गेला. नंतर दाम्पत्याने शेजारी फोन करून या घटनेची माहिती दिली. या हल्ल्यात पती-पत्नी दोघेही जबर जखमी झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा तरुण उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये नोकरी करतो. त्याने शिक्षिकेकडून 1 लाख रुपयांची मागणी केली. त्यांनी नकार दिल्यानंतर चाकूने भोसकून तो पळून गेला. सध्या या प्रकरणात पोलीस तपास करीत आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
निया शर्मा हॉट अदा पाहून चाहते झाले घायाळ, डीपनेकवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा, पहा फोटो
पुण्यात ‘या’ ठिकाणी सुरू होतेय नवीन बुधवार पेठ, समोर आला मोठा घोटाळा
नागिन ६ चे कलाकार घेतात तब्बल इतके मानधन, बिग बॉस विनर तेजस्वी प्रकाश आहे दुसऱ्या क्रमांकावर
राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेल्या शिवसेनेच्या बड्या नेत्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल, पुण्यात आणि गोव्यात नेऊन..