मुंबईने आत्तापर्यंत देशाला अनेक प्रतिभावंत क्रिकेटर दिले आहेत. यामध्ये सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी या क्रिकेटपटूंचा देखील समावेश आहे. मात्र, सचिनने ज्याप्रमाणे यश आणि प्रसिद्धी मिळवली तशी विनोद कांबळीला मिळवता आली नाही. कधी काळी गोलंदाजांना ‘सळो की पळो’ करणारा विनोद कांबळे सध्या आर्थिक अडचणींचा सामना करत आहे.
नुकतीच क्रिकेटपटू विनोद कांबळी याची मुलाखत झाली होती. या मुलाखतीत विनोद कांबळीनी बोलताना त्याच्याबाबत एक धक्कादायक खुलासा केला. रणजी सामना सुरू असताना त्याने सुमारे १० पेग दारू प्यायली होती. या संदर्भातील किस्सा त्याने सांगितला.
विनोद कांबळने सांगितलेला किस्सा म्हणजे, रणजी सामना सुरू असताना १०पेग दारू प्यायली होती. त्यामुळे दुसऱ्या दिवशी देखील फलंदाजी करण्यासाठी विनोद कांबळी उठेल की नाही? याची चिंता तत्कालीन रणजी संघाचे कोच बलविंदर सिंग संधू यांना सतावत होती.
पण, विनोद कांबळीने आदल्या रात्री १०पेग दारू पायल्यानंतर दुसऱ्या दिवशी दमदार शतक ठोकलं होतं, असा खुलासा विनोद कांबळीने स्वतः केला आहे. सध्या विनोद कांबळी आर्थिक अडचणींचा सामना करत आहे, अशावेळी सचिन तेंडुलकर कडून मदत का घेत नाही अशी विचारला त्याला करण्यात आली.
त्यावर विनोद कांबळीने सांगितले की, सचिनला सर्व काही माहिती आहे. मात्र, मला त्याच्याकडून कशाचीही अपेक्षा नाही. त्याने मला तेंडुलकर मिडलसेक्स ग्लोबल अकॅडमीमध्ये काम दिले आहे. मला तेव्हा खूप आनंद झाला होता. तो माझा चांगला मित्र आहे. तो माझ्यासाठी नेहमीच उपलब्धता असतो, शाळेत असल्यापासून त्याने माझी मदत केली आहे.
तसेच म्हणाला, सध्या मला कामाची गरज आहे. मुंबईने अमोल मुझुमदार यांना मुख्य प्रशिक्षक म्हणून कायम ठेवलं आहे. पण, गरज भासली तर मला संधी द्यावी. मला मुंबईच्या संघासोबत काम मिळावे, अशी माझी इच्छा आहे, माझे कुटुंब आहे, मला कामाची आवश्यकता आहे असे विनोद कांबळी यावेळी म्हणाला.