Share

नोकरीला लाथ मारून पठ्ठ्यानं फुलवला स्ट्रॉबेरीचा मळा; झाला मालेमाल, वाचा युवा शेतकऱ्याची यशोगाथा

strawberry

करोना विषाणूचा प्रसार आटोक्यात येण्यासाठी सरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेतला होता. मात्र या काळात अनेकांना नोकरी गमवावी लागली. हातावर पोट असणाऱ्ऱ्या गरिबांना आर्थिक समस्येचा सामना करावा लागला. तसेच काहींनी हातची नोकरी सोडून गावी जाण्याचा निर्णय घेतला.

अशाच एका तरुणाने नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय घेतला आणि त्यात त्याला भरघोस यश मिळाले आहे. अक्षय सागर असे या युवा शेतकऱ्याचे नाव आहे. कृषी पदवीधर असलेल्या अक्षय सागरने कोरोना काळात नोकरी सोडली आणि गावी येत केशर आंब्याच्या बागेत आंतरपीक म्हणून स्ट्रॉबेरीची लागवड केली.

विशेष बाब म्हणजे अक्षयने दुष्काळी भाग म्हणून ओळख असलेल्या सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात स्ट्रॉबेरीची यशस्वी शेती केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय सागरने 35 गुंठ्यात मल्चिंग व ठिबक सिंचनावर बेड पद्धतीने आर वन जातीची स्ट्रॉबेरी लावली आहे.

दरम्यान, अक्षयने दिलेल्या माहितीनुसार, स्ट्रॉबेरीची लागण केल्यापासून दीड महिन्यातच उत्पन्न सुरू झाले. एका रोपास सरासरी एक ते दीड किलो उत्पन्न मिळत आहे. लागवडीचा खर्च वजा जाता एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल अशी परिस्थिती असल्याचे अक्षयने सांगितले आहे.

तसेच लोकल मार्केटमध्येच किलोलो 300 रुपयांचा दर मिळत आहे. याचबरोबर शेणखत, रासायनिक खतांचा वापर केल्यायमुळे स्ट्रॉबेरीचे पीक उत्तम दर्जाचे आले असल्याचे अक्षयने सांगितले. 25 ऑक्टोबरला महाबळेश्वरमधील शेतकऱ्यांकडून मदर प्लांटपासून बावीसशे स्ट्रॉबेरी रोपं आणली होती.

दरम्यान, सांगली जिल्ह्यात सध्या अक्षयच्या स्ट्रॉबेरी मळ्याची चर्चा सुरू आहे. नोकरीला लाथ मारून शेतीत मिळवलेल हे उत्पन्न पाहायला अनेक नागरिक येत आहेत. जिल्ह्यात तरुण वर्गासाठी अक्षयने एक आदर्श निर्माण केला आहे. अक्षयवर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होतं आहे.

महत्त्वाच्या बातम्या
‘अशांना उत्तर कोरियातच सोडलं पाहिजे’; युक्रेनमधून सुटका झालेल्या विद्यार्थ्यांच्या ‘त्या’ कृत्यावर भडकले लोक
युक्रेनच्या चिंतेत वाढ, एकाचवेळी लढावे लागणार ‘या’ दोन देशांच्या सैनिकांसोबत; पुढचे २४ तास महत्वाचे
१२ कोटी मागीतल्याने करीनाची सीतेच्या भूमिकेतून हकालपट्टी; आता ३२ कोटी घेत कंगना बनली सर्वात महागडी अभिनेत्री
rural election: ‘या’ पक्षाने भाजप-काँग्रेसला दिला धोबीपछाड, 90 टक्के जागांवर केला कब्जा

इतर ताज्या बातम्या राज्य शेती

Join WhatsApp

Join Now