राजू श्रीवास्तव(Raju Shrivastav): प्रसिद्ध व लोकप्रिय कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना १० ऑगस्टला वर्क आऊट करताना हृदयविकाराचा झटका आला. तेव्हापासून त्यांचावर दिल्ली येथील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सगळीकडून त्यांच्या उत्तम प्रकृतीसाठी प्रार्थना केली जात आहे. त्यांच्या आरोग्याबाबद्दल दररोज काही ना काही माहिती समोर येत आहे.
राजू श्रीवास्तव सध्या व्हेंटिलेटरवर आहेत, त्यांना शुद्धीवर येण्यासाठी दोन आठवड्यापेक्षा जास्त वेळ लागणार असल्याची माहिती समोर आली आहे. एम्सच्या डॉक्टरांना वाटत आहे की, त्यांचा मेंदू ऑक्सिजनच्या मदतीने हळूहळू नवीन पेशी तयार करून स्वतःला थोडा बरा करू शकेल. ही प्रक्रिया अतिशय संथ असल्याने, शुद्धीवर येण्यासाठी दोन आठवड्यांपेक्षा जास्त वेळ लागू शकतो.
अशातच एका अनोळखी व्यक्तीने राजू श्रीवास्तव यांच्या आयसीयू रूममध्ये जाऊन सेल्फी काढण्यास सुरुवात केली. यामुळे श्रीवास्तव यांचे कुटुंब चिंतेत आहे व त्यांनी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. आयसीयूच्या बाहेर कडक सुरक्षा बंदोबस्त केला आहे. कोणालाही परवानगी घेतल्या शिवाय आत जाऊ दिले जात नाही. त्यांची प्रकृती लवकरात लवकर रिकव्हर होण्याकरिता त्यांच्या घरी पूजा करण्यात येणार आहे.
राजू श्रीवास्तव यांचे थोरले भाऊ सीपी श्रीवास्तव यांच्या राहत्या घरी दिल्ली येथेच ही पूजा केली जाणार आहे. पूजेला राजूंच्या पत्नी शिखा सोबतच संपूर्ण कुटुंबही सहभागी होणार आहे. राजू श्रीवास्तव यांचे चाहते देखील त्यांच्यासाठी सोशल मीडियावर प्रार्थना करताना दिसत आहेत. राजुच्या अनेक चाहत्यांनी ट्विट करूनही त्यांच्या प्रकृतीत सुधार होण्याकरीता प्रार्थना केली आहे.
गेल्या आठवड्यात अभिनेत्री शेखर सुमन यांनीही राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबाबत अपडेट दिले होते. त्यांनी ट्विट केले होते की, ‘राजूच्या कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार, राजुचे अवयव सामान्यपणे काम करत आहेत. मात्र, अजूनही तो बेशुद्ध आहे. तो सातत्याने बरा होत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. ही सर्व महादेवाची कृपा आहे. हर हर महादेव.’
याआधी राजूचा धाकटा भाऊ दीपू श्रीवास्तव यानेही एक व्हिडिओ शेअर करून अपडेट दिले होते. त्याच्या भावाने सांगितले होते की, तो एक सेनानी आहे आणि लवकरच युद्ध जिंकून परत येईल आणि आपल्या कॉमेडीने सर्वांना हसवेल. राजू श्रीवास्तव यांचा २७ दिवस जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते मृत्यूबद्दल बोलत होते. या व्हिडीओमध्ये राजू म्हणत आहेत, आयुष्यात प्रत्येकाने असे काम केले पाहिजे की, जेव्हा जेव्हा यमराज येईल तेव्हा तोही तुम्हाला घेऊन जाताना म्हणेल की, तुम्ही म्हशीवर बसा मी पायी चालतो. आयुष्य असे असावे की यमराज स्वतः चालेल, पण तुम्हाला म्हशीवर घेऊन जाईल.
महत्वाच्या बातम्या
Wedding Card: डॉक्टर जोडप्याने चक्क औषधाच्या पाकीटाप्रमाणे छापली लग्नपत्रिका, फोटो पाहून नेटकरी हैराण
‘मुख्यमंत्री साहेबांना व्यक्तिगत लफड्यात, अनैतिक संबंधांत कोणता विकास साध्य करायचाय?’
Russia : भारतावर होणाऱ्या मोठ्या हल्ल्याचा झाला पर्दाफाश; समोर आलेली माहिती वाचून हादराल
शिंदे-ठाकरे वादावर सर्वोच्च न्यायालयाचा सर्वात मोठी निर्णय; गुरूवारपासून नवा अध्याय सुरू