आजपर्यंत तुम्ही अनेक आंदोलनं पाहिली असतील, इतिहासातील काही आंदोलनाबद्दल वाचलं, ऐकलं असेल मात्र सध्या श्रीलंकेत सुरू असलेले आंदोलन तुम्ही याआधी पाहिलं किंवा वाचलं नसेल. श्रीलंकेत विचित्र जनआंदोलन सुरू आहे. लोकांनी अगदी देशाच्या पंतप्रधानांना देखील सोडलं नाही.
श्रीलंकेत आंदोलक एवढे आक्रमक झाले आहेत की, ते पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांच्या बेडरूममध्ये घुसून चक्क WWE खेळू लागले आहेत. कोणी घरात मजा करत आहे, आराम करत आहे. स्विमिंग पूलमध्ये अंघोळ करत आहेत. आंदोलकांनी घरात घुसून पुर्णपणे घराचा ताबा मिळवला आहे.
रानिल विक्रमसिंघे यांच्या घरातील किचनमध्ये जे काही मिळतेय ते लोकं खात आहेत. गार्डनमधली झाडं, फुलं वगैरे तोडत आहेत. एवढेच नाही तर त्यांनी पंतप्रधानांची तिजोरी फोडून त्यामधील कोट्यवधी रुपये काढले होते. आर्थिक संकटामुळे मेटाकुटीला आलेल्या सर्व लोकांचा यात समावेश होता.
आंदोलक पंतप्रधानांच्या घरात घुसून जी मजा करत आहेत त्याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये घरात घुसलेले आक्रमक आंदोलक पंतप्रधानांच्या बेडरूममध्ये WWE खेळताना दिसत आहेत. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
https://twitter.com/Bhai_saheb/status/1546026788081762305?t=x2-c5ptP9KYSnYD6XWxXhg&s=19
सध्या, श्रीलंकेतील सत्ताधाऱ्यांना आक्रमक जनरेट्याने धक्का दिला आहे. अध्यक्ष गोताबाय राजपक्षे यांना परिस्थितीचा अंदाज आल्याने त्यांनी शुक्रवारीच पलायन केले आहे. हजारो आंदोलकांनी राष्ट्राध्यक्षांच्या सरकारी निवासस्थानात घुसून त्यावर ताबा मिळवला.
आता नुकतेच आंदोलकांचा आवेश पाहून, देशात सर्वपक्षीय सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा करण्यासाठी आपण राजीनामा देण्यास तयार आहोत, अशी घोषणा पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी केली आहे. एकप्रकारे आर्थिक संकटाच्या गर्तेत सापडलेल्या नागरिकांच्या रोषाला यश मिळत असल्याचं चित्र सध्या श्रीलंकेत दिसत आहे.