Share

प्रेमाची अजब कहाणी! 80 वर्षांचे आजोबा पडले 84 वर्षांच्या आजीच्या प्रेमात; दोघे पळून गेले मात्र….

प्रेमाला वय नसतं असं म्हणतात. आत्तापर्यंत तुम्ही तरुण युगलांना प्रेमात वेडे होऊन पळून जाण्याच्या घटना ऐकल्या असतील, मात्र आता एक अशी घटना घडली आहे ज्यात चक्क 80 वर्षांचे आजोबा हे 84 वर्षांच्या आजीच्या प्रेमात पडले आणि पळून गेले.

80 वर्षांचे आजोबा एका 84 वर्षांच्या आजीच्या प्रेमात पडले. आजोबा आजीच्या प्रेमात एवढे वेडे झाले की, त्यांनी आजीला पळून नेलं. पण त्यांची लव्हस्टोरी जास्त काळ टिकू शकली नाही. कारण आजीच्या घरच्यांच्या मदतीने पोलिसांनी त्या दोघांना शोधले. आजोबांना त्यानंतर न्यायालयात उभं करण्यात आलं, आणि त्यांना न्यायाधीशाने शिक्षा दिली.

आजी आणि आजोबा यांच्या प्रेमाबद्दल सांगायचं झाल्यास, ही आजी आजोबांची जोडी ऑस्ट्रेलियामधील आहे. 80 वर्षांच्या आजोबांचे नाव राल्फ गिब्स आहे. ते ज्या आजीवर प्रेम करायचे तिचे वय 84 वर्ष आहे, तिचे नाव कॅरोल लिस्ले आहे. ही आजी डिमेन्शिया आणि पार्किंसन्शी या आजाराला झुंज देत आहे. या आजारामुळे तिची स्मरणशक्ती कमकुवत झाली आहे.

तरीदेखील हे आजोबा रोज आजीला नव्याने भेटून सगळं काही नव्याने सुरुवात करायचे. प्रेमामुळे ते आजीच्या या आजाराला सांभाळत. आजीच्या प्रेमापुढे त्यांना आजीचा आजार कधीच दिसला नाही. तिच्या आजाराचा ते कधीच त्रास मानत नव्हते. उलट त्यांचं अधिक अधिक प्रेम वाढत गेलं.

आजीला सतत स्वतः जवळ ठेवावं असं त्यांना वाटत होतं. एक दिवशी नेहमीप्रमाणे आजीच्या कुटूंबीयांनी आजीच्या उपचारासाठी तिला रुग्णालयात नेलं. आजीवर तिच्या आजारामुळे उपचार सुरू होते. दरम्यान, आजोबा यांनी आजीला संधीचा फायदा घेत रुग्णालयातून पळून नेण्याचा बेत आखला.

आजोबांनी मोठ्या धाडसाने आजीच्या कुटुंबाला न कळता तिला रुग्णालयातून पळून नेलं. आजीला सोबत आणल्याने आजोबा प्रचंड खुश होते. मात्र त्यांचं हे प्रेम खूप दिवस टिकू शकलं नाही. कुटूंबीयांनी पोलिसात तक्रार केली, आणि आजीचा शोध घेणं सुरू केलं.

काही दिवसांनी आजीचा तपास लागला. आजोबांनी आजीला घेऊन क्विसलँडला पळून जाण्याचा बेत आखला होता. परंतु, त्या पूर्वीच पोलिसांनी त्यांना पकडलं. त्यानंतर एअरलिफ्ट करून आजीला त्यांच्या घरी सोडण्यात आलं. मात्र, आजोबा यांच्यावर अपहरणाचा गुन्हा नोंदवून त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं. या आजी आजोबांच्या प्रेमाची कहाणी ऐकून न्यायाधीशांना देखील अश्रु अनावर झाले. मात्र, त्यांचे कायद्याने हात बांधल्यामुळे आजोबांना 7 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा दिली.

इतर

Join WhatsApp

Join Now