एखादी हौस करायची म्हटलं की त्याला वय नसतं असं म्हणतात. त्यातल्या त्यात जर आयुष्य संपत आलं असेल, तर त्याआधी लोक आपल्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा पूर्ण करतात. अशीच एक इच्छा 82 वर्षाच्या आजीनं व्यक्त केली आहे. मात्र, तिनं व्यक्त केलेली ही इच्छा ऐकून तुम्हांला देखील आश्चर्य वाटेल.
82 वर्षाच्या या वृद्ध आजीनं तिची आतापर्यंत जी इच्छा अपूर्ण होती, ती व्यक्त केली आहे. तिची इच्छा ऐकून तिच्या कुटूंबियांना देखील धक्का बसला आहे. कारण, आजीनं चक्क तिच्या 82 व्या वर्षी आपल्या शरीरावर टॅटू गोंदवायचा आहे अशी इच्छा व्यक्त केली आहे. सध्या ही वृद्ध महिला तिच्या या गजब इच्छेमुळे सोशल मिडियावर चर्चेत आली आहे.
या आजीबाईंचं नाव जूडी डे असं आहे. आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांनी शरीरावर टॅटू गोंदवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तिचे कुटूंबीय देखील तिची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आजीची नात ब्रँडी हिने हा मजेशीर किस्सा टिक-टॉकवर शेअर केला आहे. आजीची ही शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी कुटुंबातील सर्व सदस्य तिच्यासोबत टॅटू पार्लरमध्ये गेले होते, अशी माहिती तिच्या नातीनं दिली.
खरं तर जूडी यांना तरुणपणी टॅटू गोंदवण्यासाठी फार इच्छा होती. परंतु आई-वडिलांमुळे त्यांची ही इच्छा अपूर्णच राहिली. त्यांचे कुटुंबीय हे पक्के ब्रिटीश होते. शरीरावर टॅटू गोंदवणं हे असभ्यपणाचं लक्षण आहे असं ते मानत. परंतु आयुष्याच्या उत्तरार्धात आता त्यांना रोखणारं कोणी नाही. त्यामुळे आता त्यांनी टॅटू काढण्याचा निर्णय घेतला.
सुरुवातीला त्यांची ही इच्छा ऐकून सर्वच जण चकित झाले. परंतु नंतर नातीने समजावताच सर्व मंडळींनी आजीला पाठिंबा दिला. दरम्यान टॅटूचं डिझाईन अद्याप निश्चित केलेलं नाही. शिवाय टॅटू शरीराच्या कुठल्या भागावर काढावा यावर देखील त्या विचार करत आहेत. लक्षवेधी बाब म्हणजे त्यांची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी कुटुंबीय त्यांना मदत करत आहेत.
आजी आणि तिचे कुटूंबीय गेले 15 दिवस वेगवेगळ्या टॅटू पार्लरमध्ये जाऊन युनिक अशा डिझाईनचा शोध घेत आहेत. शक्य झाल्यास कुटुंबातील सर्व सदस्य आजीच्या आठवणीत आपल्या शरीरावर आजी काढेल तोच टॅटू काढतील असा विचार करत आहेत. त्यामुळे आता या आजीची इच्छा कधी पूर्ण होईल याकडे सर्वांचे लक्ष आहे.