यावर्षीच्या सुरुवातीलाच अनेक कलाकारांच्या घरी नवीन पाहुणा आला आहे. यामध्ये अभिनेत्री देबिना बॅनर्जीचा देखील समावेश आहे. काही दिवसांपूर्वीच देबिना बॅनर्जीला गोड अशी मुलगी झाली आहे. या बाळाची ती आतुरतेने वाट पाहत होती. सध्या आपल्या बाळासोबत देबिना सुखद क्षण घालवत आहे.
या खास क्षणांचे व्हिडिओ, फोटो देबिना सतत आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करत असते. नुकताच देबिनाने आपल्या बाळासोबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. परंतु हा व्हिडिओ पाहताच देबिनावर नेटकरी चांगलेच संतापले आहेत.
देबिनाने शेअर केलेल्या व्हिडिओत ती आपल्या बाळासोबत गाणी गाताना दिसत आहे. मात्र तिने ज्या पद्धतीने बाळाला धरले आहे त्यावरून अनेकांनी तिला सुनावले आहे. तिची बाळाला धरण्याची पद्धत पाहून नवजात बाळाला कसे घ्यावे, कसे पकडावे याविषयी नेटकऱ्यांनीच देबिनाला टिप्स दिल्या आहेत.
एकाने तर, बाळ म्हणजे खेळणं वाटलं का तुला? असे म्हणत देबिनाविषयी राग व्यक्त केला आहे. तसेच, “व्हिडिओसाठी दिखावा सुरू आहे..” असे ही तिला काहींनी म्हणले आहे. त्यामुळे कौतुकाची अपेक्षा ठेवणाऱ्या देबिनाला नेटकऱ्यांनी यावेळी चांगलेच ट्रोल केले आहे.
दरम्यान एखाद्या नवजात बाळाला नेहमी व्यवस्थितपणे धरावे लागते, त्याची व्यवस्थितरित्या काळजी घ्यावी लागते. मात्र ही काळजी घेणे देबिनाला जमले नसल्यामुळे नेटकऱ्यांनी तिच्यावर टीका केली आहे. मध्यंतरी देबिनाने आपल्या वाढदिवसाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोत ती आपल्या बाळासोबत दिसली होती. तेव्हा तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया आल्या होत्या.
महत्वाच्या बातम्या
सोमय्यांवरील हल्ल्यावेळी Z सेक्युरिटी कुठे होती? जाब विचारणाऱ्या CISFला आयुक्तांकडून जशास तसे उत्तर
‘शेर शिवराज’ने फक्त ४ दिवसांतच जमावला ‘एवढ्या’ कोटींची गल्ला, सगळे शो हाऊसफुल
मंदिराच्या उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना, १० भाविकांचा जागीच मृत्यू; धक्कादायक कारण आले समोर
सुहागरातच्या रात्री नवरी निघाली किन्नर, जाग्यावर बेशुद्ध झाला नवरदेव, वाचा नेमकं काय घडलं?