नुकताच यूपीएससीचा निकाल लागला. अनेक खडतर परिस्थितीमधून अभ्यास करून परीक्षेत यश मिळणारी उदाहरणे या निमित्ताने पुढे आली. यामध्ये रिंकू राही यांचे देखील उदाहरण आहे. रिंकू राही पीसीएस अधिकारी असून यांनी अनेक संकटांना सामोरे जाऊन आपल्या जिद्दीने यूपीएससी क्रॅक केली आहे.
समाज कल्याण विभागात अधिकारी असलेल्या रिंकू सिंह यांनी १३ प्रयत्नानंतर युपीएससी परिक्षेत यश मिळवलं आहे. त्यांना ६८३वा रँक मिळाला आहे. अलीगढच्या डोरी नगरचे ते रहिवासी आहेत. अनेक अडचणींवर मात करत युपीएससीचं स्वप्न त्यांनी साकार केलं, यामुळे त्यांचे सर्वत्र कौतूक होत आहे.
रिंकू राही २००४ च्या बॅचचे पीसीएस अधिकारी असून हापुडी येथील समाज कल्याण विभागात अधिकारी आहेत. समाज कल्याण विभागात काम करत असतानाच त्यांनी युपीएससीची तयारीही सुरू ठेवली. रिंकू सिंह यांनी याआधी १२ वेळ वेळा प्रयत्न केल्यानंतर आता त्यांना युपीएससी ६८३ रँक मिळाली आहे. आता रिंकू सिंह पीसीएसहून आयएएस अधिकारी झाले.
ते दलित आहेत आणि त्यांच्या संघर्षाची कहाणी प्रेरणादायी आहे. मुझफ्फरनगरमध्ये जिल्हा समाज कल्याण अधिकारी असताना त्यांनी 2009 मध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा उघडकीस आणला होता. घाबरलेल्या माफियांनी त्याच्यावर हल्ला केला होता. त्याला सात गोळ्या लागल्या, त्यापैकी एक गोळी तोंडाला लागली. गोळी तोंडाला लागल्यामुळे त्यांचा संपुर्ण चेहरा खराब झाला होता.
घोटाळ्यावर कारवाई होत नव्हती. ते उपोषणाला बसले असता पोलिसांनी त्यांना मानसिक रुग्णालयात दाखल केले. सरकारी आयएएस-पीसीएस कोचिंग सेंटर हापूरच्या प्रभारी रिंकू सिंग राही यांना सध्याच्या पोस्टिंग दरम्यानच सरकारने दोनदा आरोपपत्र दिले होते. त्यांना गोळ्या घातल्या, तेव्हा तिथे बसपाचे सरकार होते. सपा सरकारच्या काळात त्यांना वेड्याच्या इस्पितळात पाठवण्यात आले होते आणि भाजप सरकारच्या काळात त्यांना निलंबित करण्यात आले होते.
२०१५- १६ मधील ही गोष्ट आहे. श्रावस्ती व २०१८ मध्ये ललितपूर येथे पोस्टिंग दरम्यान त्यांच्यावर खोटे आरोप करण्यात आले होते. ड्युटी करत असताना प्रशासनाकडून रिंकू सिंह राही यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं. यामागचे कारण त्यांचा प्रामाणिकपणा होता. मात्र या अडचणी आल्यामुळे त्यांनी कधीच आपला प्रामाणिकपणा सोडला नाही.
महत्वाच्या बातम्या
सलमानला जीवे मारण्यासाठी घेतली ४ लाखांची रायफल, पण ‘यामुळे’ फसला प्लॅन, लॉरेन्स बिश्नोईचा मोठा खुलासा
‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाच्या सिक्वलची घोषणा करत विवेक अग्निहोत्री यांचा शिवसेनेला टोला, म्हणाले….
आपण पंतप्रधान होणार आहे हे मोदींना २००४ मध्येच कळलं होतं; जाणून घ्या सत्य साईबाबांसोबतचा ‘तो’ किस्सा
अंबानींची सून राधिका मर्चंटचा ‘अरंगेत्रम’ सोहळा, सलमान, रणवीरसह ‘या’ दिग्गजांची हजेरी; पहा फोटो..