Share

Beauty Tips: वाढत्या वयाची चिंता सोडा अन् वापरा ‘हे’ घरगुती उपाय, चाळीशीतही दिसाल एकदम तरुण

beauty

ब्यूटी टिप्स(Beauty Tips): प्रत्येक मनुष्याला तीन अवस्थेतून जावं लागत. बालपण, तरुणपण, वृद्धावस्था. यापैकी बालपण हे सहज निघून जातं, तेव्हा सगळेच सुंदर दिसतात. स्किनचे प्रॉब्लेम तरुण वयात सुरु होतात. सुंदर दिसायला सगळ्यांना आवडतं, पण काही कारणामुळे काही लोकांची त्वचा लवकर वयस्क दिसू लागते. खानपानाच्या सवयी, त्वचेची काळजी घेण्यात आळस करणे या कारणांमुळे त्वचा वयस्क दिसू लागते.

त्यामुळे आहारात फळांचा समावेश करून याबाबत चिंता मुक्त होऊ शकता. त्याचबरोबर घरगुती छोट्या टिप्स वापरूनही तुम्ही चिंतामुक्त होऊ शकता. या टिप्समुळे तुमचे वाढते वयसुद्धा दिसणार नाही. दररोजच्या वापरातील काही घरगुती वस्तू वापरून तुम्ही सुंदर दिसू शकता.

१. अंड्याचा पांढरा भाग वापरून तुम्ही चेहरा सतेज व सुंदर बनवू शकता.
साहित्य : अंड्याचा पांढरा भाग, लिंबाचा रस
कृती: एका कपमध्ये एक चमचा अंड्याचा पांढरा भाग आणि एक चमचा लिंबाचा रस मिसळून चेहऱ्याला लावा. 15 मिनिटांनंतर चेहरा धुवून घ्या. असे आठवड्यातून दोनवेळा करा. चेहऱ्यावरील डाग कमी होण्यास मदत होते.

२. आपण दररोज जेवणात दही वापरणे तर योग्यच पण त्याचबरोबर दही चेहऱ्यासाठीही उपयोगी ठरते.
साहित्य: बेसन (चना डाळीचे पीठ), दही
कृती: एका वाटीत अर्धा चमचा बेसन 1 चमचे दह्यात मिसळून पेस्ट तयार करा आणि चेहऱ्याला लावा. त्यानंतर हळूच चेहऱ्याची मसाज करा आणि 10 मिनिटांनी चेहरा धुवून घ्या. त्वचेला घट्टपणा येईल. चेहऱ्याचे एकप्रकारे यातून क्लीनजिंग होईल.

३. मध हे आपल्याला खोकला झाल्यावर उपयोगी पडते, हे तर ऐकलंच पण मध तेवढेच चेहऱ्यासाठीही उपयोगी आहे.
साहित्य: मध, गव्हाचे पीठ
कृती: एका भांड्यात 1 चमचा मध आणि 1 चमचे गव्हाचे पीठ मिक्स करून चेहऱ्याला लावा. 10 मिनिटांनी चेहरा धुवून घ्या. यामुळे चेहरा उजळेल.

४. फळभाज्या तर दररोजच्या जेवणात वापरणे आवश्यक आहे. यामुळे आजार जवळ येत नाही. वजन घटवण्यासाठीही काकडी महत्वाची ठरते.
साहित्य : काकडीचा रस, गुलाब जल
एका भांड्यात 1 टीस्पून काकडीचा रस आणि 1 टीस्पून गुलाबजल मिसळा आणि कापसाच्या मदतीने चेहऱ्यावर लावा. रात्री ते लावून झोपू शकता.

५. आपण दररोजच्या आहारात भात सेवन करतो, पण कच्चा तांदूळही चेहऱ्यासाठी उपयोगी पडतो.
साहित्य: तांदळाचे पाणी, गुलाब जल
कृती: एका भांड्यात 1 टेबलस्पून तांदळाचे पाणी आणि 1/2 चमचे गुलाबजल घ्या आणि 15 मिनिटे चेहऱ्यावर ठेवा. नंतर पाण्याने स्वच्छ धुवा. आता चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावा.

६. कोरफड ही औषधी वनस्पती आहे. यामुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर होतात.
साहित्य: कोरफड जेल, लिंबाचा रस
कृती: एका भांड्यात 1 चमचा कोरफड जेल घ्या आणि त्यात 5 थेंब लिंबाचा रस घाला. आता ते चेहऱ्यावर चांगले लावा. रात्रीच्या वेळी लावल्यास चांगले होईल. याऐवजी तुम्ही साधी कोरफड सुद्धा चेहऱ्याला लावू शकता. यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतील.

७. बदाम शरीरासाठी उत्तम आहे. त्यामुळे आकलन क्षमता वाढते. त्याचबरोबर बदामाचे तेलही गुणकारी आहे.
साहित्य: बदाम तेल, खोबरेल तेल, लिंबाचा रस
कृती; 1/2 टीस्पून खोबरेल तेल, 5 थेंब बदाम तेल आणि 5 थेंब लिंबाचा रस एका भांड्यात मिसळा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावून मसाज करा. 10 ते 15 मिनिटांनी चेहरा साध्या पाण्याने धुवा. यामुळे चेहऱ्यावरील बारीक फोड कमी होतील

८. व्हिटॅमिन ई तेल व कॅप्सूल दोन्ही चेहऱ्यासाठी अत्यंत गुणकारी आहे.
साहित्य: गुलाबजल, व्हिटॅमिन ई तेल
कृती: एका भांड्यात 1 चमचा गुलाबजल आणि 5 थेंब व्हिटॅमिन-ई तेल मिसळा. याने चेहऱ्याला 5 मिनिटे मसाज करा. रात्रीच्या वेळी हे लावल्यास ते चांगले होईल.

महत्वाच्या बातम्या
Sword of Tipu Sultan : टिपू सुलतानाची पराक्रमी तलवार पुन्हा येणार भारतात; ब्रिटनने घेतला मोठा निर्णय
God Father: चिरंजीवी अन् सलमानच्या जुगलबंदीने, जबरदस्त स्टाईलने चाहते झाले वेडे, पहा ट्रेलर
Hritik Roshan : ह्रतिकरोशनमुळे झोमॅटोला कोट्यावधींचा फटका; असं काय झालं की ग्राहकांनी केली बॉयकाॅट झोमॅटोची मागणी? जाणून घ्या… 
Accident: ओव्हरटेकींगची घाई दुचाकीस्वाराला नडली; गाडीच्या कॅमेऱ्यात रेकाॅर्ड झालेल्या अपघाताचा व्हिडीओ पाहून थरकाप उडेल

 

शिक्षण आरोग्य इतर ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now