अनेकदा असं होतं की, मोठं – मोठे मासे समुद्रकिनारी येतात. ते एवढे मोठे असतात की, पाहून सर्वांनाच धक्का बसतो. हे सांगण्याच कारण म्हणजे, अलिबाग समुद्र किनाऱ्यावर तब्बल शंभर किलो वजनाचा मासा सापडला आहे. सध्या सर्वत्र याच माशाची जोरदार चर्चा सुरू आहे.
जाणून घ्या सविस्तर..!
सोमवारी (दि.20) सकाळी अलिबाग समुद्र किनार्यावर कोळी बांधवांना एक मोठा मासा सापडला आहे. तब्बल शंभर किलो वजनाचा पाकट मासा सापडला आहे. दिलासादायक बाब म्हणजे, खोल पाण्यातील मासेमारी बंद असताना पाकट मासा सापडल्याने दिलासा मिळाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाघ्या पाकट नावाचा हा मासा आहे. दोन भावांना हा महाकाय मासा सापडला आहे. एवढा मोठा मासा आणि तोही क्वचित सापडणारा वाघ्या पाकट मिळाल्याने दोघेही अतिशय खुश आहेत. याचबरोबर वाघ्या पाकट शरीरासाठी चांगला मानला जात असल्याने त्याला मागणी सुद्धा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाखवा सुनील हे भाटेबंदर किना-यावर त्यांच्या भावासोबत मासेमारी करतात. तसेच त्यांची एकवीरा ही लहान बोट आहे. सुनील म्हणतात की, मासेमारीला करताना एवढा मोठा मासा सापडेल असे वाटले नव्हते, असं त्यांनी सांगितलं आहे.
हा मासा नशिबवान व्यक्तीलाच सापडतो. मुंबईच्या बाजारात व्यापाऱ्यांना तो विकला तर त्याची आम्हाला 15 हजार रुपये एवढी किंमत मिळू शकते, असेही सुनिल म्हणाले आहे. सुनिल सांगतात की, पाकट माशाच्या यकृतापासून आणि शरीरापासून तेल मिळवितात. यातील यकृत तेलात अ आणि ड ही जीवनसत्त्वे असतात.
महत्वाच्या बातम्या-
Indian Team : पाकिस्तानच्या विजयाने भारताचं टेंशन वाढलं, सेमी फायनलमध्ये जाण्यासाठी उरलाय फक्त ‘हा’ एकमेव मार्ग
Vaishali Suryavashi : खबरदार! यापुढे माझ्या वडीलांचा फोटो लावला तर…; शिंदेगटातील आमदारावर बहीण भडकली
Team India : ‘हे’ पाच खेळाडू ठरलेत टीम इंडियाच्या विजयाचे हिरो; भन्नाट खेळी खेळत राखली संघाची लाज