Share

गणेशभक्तांना राज्य सरकारने दिले स्पेशल गिफ्ट; वाचून खुश व्हाल

गणपती बाप्पाच्या आगमनाला अगदी काही दिवसच बाकी आहेत. सगळीकडे बाप्पाच्या स्वागतासाठी तयारी सुरू आहे. अशातच राज्य सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना मोठी बातमी दिली आहे, त्यामुळे आता गणपती बाप्पाच्या आगमनाआधीच कर्मचाऱ्यांच्या खिशात पैसे पडणार आहेत.

राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना गणपती बाप्पा पावला असेच म्हणावे लागेल. मुंबईसह राज्यभरात गणेशोत्सवाची धामधूम सुरु झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर दिल्याने आनंदाचे वातावरण आहे.

सणसमारंभासाठी सरकारी कर्मचारी, निवृत्ती वेतनधारकांचा २९ ऑगस्टलाच पगार होणार आहे. उत्सव साजरा करताना अडचण येऊ नये यासाठी पगार लवकर होणार आहे. शासनाने यासंदर्भात काल परिपत्रक देखील काढले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

दरम्यान, त्याआधी १६ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या निवेदनानुसार महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठीचा महागाई भत्ता (DA) ३ टक्क्यांने वाढला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यात म्हटले आहे की, नवीन डीए ऑगस्टमध्येच लागू होईल. CMO च्या निवेदनानुसार, महागाई भत्ता मूळ वेतनाच्या ३४ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर्षीचा गणपती उत्सव सर्वांना धुमधडाक्यात, आनंदाने साजरा करता यावा यासाठी काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. कोकण रेल्वे प्रशासनाने गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठीही मोठा निर्णय घेतला आहे.

या निर्णयानुसार या मार्गावरील काही गाड्यांमध्ये ०२ एसी टू टायर कोच, ०२ एसी थ्री टायर कोच आणि ०१ एसी चेअर कार कोच तात्पुरत्या स्वरूपात वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे गणपती उत्सवादरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी होईल अशी अपेक्षा आहे.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now