बुधवारी निवृत्तीचे वय ६० वर्षे करण्याच्या मागणीसाठी राज्यातले १८ लाख पेक्षा जास्त सरकारी कर्मचारी, चतुर्थ श्रेणी कर्मचारी आणि शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संपावर जाणार आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागणीकडे सरकार दुर्लक्ष करत असल्यामुळे कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समितीच्या माध्यमातुन उद्या राज्यभर हे कर्मचारी संप करणार आहेत.
या संपात गॅझेटेड ऑफिसर्स आपला सहभाग नोंदवणार नाहीत. या संपावर चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्मचाऱ्यांना चर्चेसाठी बोलविले आहे. मुख्य म्हणजे २३ आणि २४ फेब्रुवारी रोजी कर्मचारी संप पुकारणार असुन या संपात निवृत्तीचं वय ६० वर्षे करण्याची मागणी प्रमुख असणार आहे.
त्यासोबतच नवी पेन्शन योजना बंद करावी तसेच जुनी पेन्शन योजना सगळ्या कर्मचा-यांना सुरू करावी अशी देखील मागणी सरकार पुढे ठेवण्यात येणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सरकारने या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे. यापूर्वी देखील कर्मचाऱ्यांनी या मागणीसाठी आंदोलन केले होते. परंतु त्यावेळी सरकारने फक्त आश्वासन दिले होते.
यावेळी मात्र कर्मचाऱ्यांनी मागे न हटण्याचा निर्णय घेतला आहे. मागच्यावेळी ज्या मागण्या सरकारने पुर्ण केल्या नाहीत त्या मागण्या या वेळी मान्य कराव्याच लागतील नाहीतर आदोलन सुरुच राहिल असा इशारा कर्मचाऱ्यांनी सरकारला दिला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत पार पडणाऱ्या बैठकीत केवळ अधिकरी आणि चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनांचेच पदाधिकारी उपस्थित असणार आहेत. या संपाच्या पार्श्वभुमिवर कर्मचारी संपात हा फूट पाडण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप संघटनांनी केला आहे. कर्मचाऱ्यांनी संपावर जाऊ नये, असे आव्हाहन राज्य सरकारने केले आहे.
दरम्यान मागे करण्यात आलेल्या संपावेळी सरकारने तोडगा काढण्यासाठी एक समिती नेमली होती. समितीसोबत कर्मचाऱ्यांच्या अनेक बैठका पार पडल्या होत्या. परंतु याकडे सरकारने लक्ष दिले नाही. त्यावेळी सरकारने सातवा वेतन आयोग लागु केला होता. यात इतर मागण्या सरकारने मागेच ठेवल्या होत्या.
महत्वाच्या बातम्या
लहान असो वा मोठा वाघ वाघच असतो! रवि जाधव दिग्दर्शित बाल शिवाजी चित्रपटाचा टिजर रिलीज
तिसऱ्यांदा लग्न केल्यानंतर ११ व्या बाळाला जन्म द्यायला सज्ज झाली ‘ही’ अभिनेत्री, चर्चांना उधाण
अल्लू अर्जुनच्या पावलावर पाऊल टाकत मुलीनेही चित्रपटसृष्टीत केले पदार्पण, ‘या’ चित्रपटात झळकणार
‘सीआयडी’ मधील एसीपी प्रद्युमनच यांची सून आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री, फोटो पाहून नाही बसणार विश्वास