एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यावर एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली. त्या पहिल्याच पत्रकार परिषदेला मुख्यमंत्री बोलत असताना मधूनच देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा माईक खेचून घेतला. या कृतीबाबत विरोधकांमध्ये नाराजीचा सूर उमटला. शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांनी आज माईक ओढला आहे, उद्या पॅन्ट ओढतील, अशी खरमरीत टीका केली. (Started pulling mike today, will pull pants tomorrow)
निर्धार सभेच्या निमित्ताने विनायक राऊत बोलताना म्हणाले की, या भगव्याचे शिलेदार अनेक आमदार पुन्हा विधानसभेवर पाठवूया, तो दिवस दूर नाही. हे सरकार ६ महिने चालले तरी नशीब. औट घटकेचं हे सरकार आहे.
पुढे बोलताना, ‘तो देवेंद्र बघा कसं ओढायला लागलाय, आज माईक ओढायला सुरुवात केली, उद्या पॅन्ट ओढेल, नागडं करून सोडणार,’ अशी खरमरीत टीका विनायक राऊत यांनी केली आहे.
‘आम्हा कोकणातल्या लोकांना आंब्याचे खोके आहे. तुम्हाला पण नाशिकचे खोके माहीत असतील. पण खोक्यांच्या राजकारणाला जे बळी पडले आहेत. त्यांना राजकीय भविष्य नाही. ते संपुष्टात आणण्यासाठी पूर्ण ताकदीने हा भगवा शिवसैनिक पुन्हा उभा राहणार, लढणार आणि जिंकणारच!’ असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेत मोठी फूट पडली. त्यामुळे शिवसैनिक गोंधळले आहेत. पक्षात मोठी अस्थिरता निर्माण झाली. त्या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी, नव्याने पक्षाला उभारी देण्यासाठी, निर्धार सभा विविध ठिकाणी शिवसेना पक्ष आयोजित करत आहे.
निर्धार सभेसाठी महाराष्ट्रभरात कधी संजय राऊत, कधी आदित्य ठाकरे तर कधी विनायक राऊत फिरताना दिसतात. पक्षात घडलेल्या मोठ्या बंडामुळे गोंधळून न जाता पक्षाला मजबुती देण्याचे पुन्हा शिवसैनिकांमध्ये स्थैर्य निर्माण करण्याचे प्रयत्न शिवसेनेकडून होताना दिसत आहेत.
महत्वाच्या बातम्या-
मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय! दुसरे लग्न करण्यासाठी सरकारची परवानगी घेण्याचे आवाहन
पक्ष सोडल्याप्रमाणे वागणूक मिळाली तर मलाही भविष्यात.., उदय सामंतांचे धक्कादायक वक्तव्य
PHOTOS: किल्ल्यावर फिरायला गेलेल्या तरुणाचा मृत्यू, दुसऱ्याला अप्पर पोलिसांनी ‘असं’ वाचवलं