स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ (Mulgi Zali Ho) ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे वृत्त सध्या माध्यमात वेगाने व्हायरल होत आहे. तसेच ही मालिका बंद होणार असल्याचे वृत्त समोर येताच अभिनेते किरण माने यांनीही यासंदर्भात एक पोस्ट शेअर केली होती. त्यामुळे ही मालिका आता बंद होणार, हे अनेक लोकांना खरं वाटलं. पण आता याबाबत स्टार प्रवाह वाहिनीने स्पष्टीकरण दिल्याचे वृत्त समोर येत आहे.
मुलगी झाली हो ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर रात्री ९ वाजता प्रसारित करण्यात येते. परंतु, आता २ मेपासून या वेळेत ‘तुझेच मी गीत गात आहे’ ही नवी मालिका प्रसारित होणार आहे. यासंदर्भात वाहिनीतर्फे या नव्या मालिकेचा प्रोमोही प्रसारित करण्यात आला आहे. त्यानंतर याबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु झाली.
‘मुलगी झाली हो’ मालिकेचा टीआरपी घसरल्याने आता ही मालिका गुंडाळण्याचा निर्णय वाहिनीने घेतला, अशी चर्चा सुरु झाली. तसेच ही वृत्त समोर येताच या मालिकेत पूर्वी विलास पाटील ही भूमिका साकारणारे अभिनेते किरण माने यांनी एक पोस्ट शेअर केली. मालिकेचा टीआरपी काय घसरला चॅनलनं अख्खी मालिकाच लाथ घालून हाकलली, असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले.
त्यानंतर अनेकांनी हे वृत्त खरे समजले. परंतु, आता याबाबत स्टार प्रवाह वाहिनीमार्फत स्पष्टीकरण देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. बातम्यांनुसार, वाहिनीमार्फत सांगण्यात आले की, ‘नवी मालिका सुरु होत आहे याचा अर्थ असा नाही की जुनी मालिका बंद होणार आहे. ‘मुलगी झाली हो’ मालिका स्टार प्रवाहवर दुपारी २ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे’.
दरम्यान, ‘तुझेच मी गीत गात आहे’ ही मालिका ‘कुल्फी कुमार बाजेवाला’ या हिंदी मालिकेचा मराठी रिमेक असणार आहे. तर या मालिकेत नेमके कोणकोणते कलाकार आहेत, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. पण या नव्या मालिकेसाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
लोकांना वाटले होते की माझं करिअर इथेच संपलं पण.., kaun pravin tambe च्या यशानंतर श्रेयसचा खुलासा
रात्रभर त्रास सहन करत राहिली भारती सिंग, लेबर पेन होत असतानाही ‘या’ कारणामुळे केला व्हिडीओ शुट
हल्दीरामच्या पॅकेटवर दिसलं असं काही की सोशल मिडीयावर होतेय बहिष्कार टाकण्याची मागणी