आता यावरून राज्यातलं राजकारण चांगलंच तापलं असून विविधांगी प्रतिक्रिया उमटत आहेत. अशाच राष्ट्रवादीच्या आमदाराने एक खळबळजनक विधान केले आहे. ‘परिवहन मंत्रीपद हे शिवसेनेकडे आहे, त्यामुळे या विषयाशी पवारांचा दुरान्वयेही संबंध नाही,’ असं राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते म्हणाले.
ते खेड-आळंदी या त्यांच्या मतदारसंघात शुक्रवारच्या हल्ल्याचा निषेध करताना बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘प्रश्न राज्याचा होता, त्यामुळे हल्ला करायचा होता तर ‘मातोश्री’वर करायचा होता, मग तुम्हाला या हल्ल्याची किंमत कळाली असती, असे दिलीप मोहिते म्हणाले.
पुढे बोलताना दिलीप मोहिते म्हणाले, ‘आतापर्यंत राज्यात जितके आंदोलन झाली. त्याचा शेवट बारामतीला व्हायची. राज्याचं परिवहन खातं अनिल परबांकडे आहे. जे काही करायचे होते ज्यांच्याकडे खाते आहे तिथे करायचं होतं. या विषयाशी पवारांचा संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, पवार यांच्या घरावर करण्यात आलेल्या हल्ला प्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर, शनिवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर किला न्यायालयाने गुणरत्न सदावर्ते यांचा जामीन अर्ज फेटाळत दोन दिवसांची म्हणजेच ११ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
तसेच याप्रकरणी १०७ आंदोलकांवर गावदेवी पोलीस ठाण्यात दंगल माजवण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशातच आता राष्ट्रवादीच्या आमदाराने केलेल्या या विधानामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये आणखीच खळबळ उडाली आहे. यावर आता काय प्रतिक्रिया येतात हे पाहणे महत्त्वाच ठरणार आहे.