Share

लालपरीने पुन्हा सिध्द करून दाखलं! दीड महिन्यात केली ‘इतक्या’ कोटींची कमाई; आकडा वाचून चकीत व्हाल

st

एसटीचे शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी काही दिवसांपूर्वी कर्मचाऱ्यांनी सुमारे पाच महिने आंदोलन केले होते. अखेर एसटी कामगारांच्या आंदोलनाला यश मिळाले. पाच महिन्यांपासून विविध मागण्यांसाठी आंदोलन करीत असलेल्या एसटी कामगारांच्या काही मागण्या उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य सरकारने मान्य केल्या.

विलीनीकरण झाले नाही, पण वेतनवाढ आणि पगाराची शाश्वती कर्मचाऱ्यांना मिळाली आहे. एसटी कामगारांना पेन्शन, ग्रॅच्युईटी आणि बोनस देण्याचे राज्य सरकारने जाहीर केले. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने राजकीय वर्तुळात देखील आरोप – प्रत्यारोपांचे सत्र रंगले होते.

तर दुसरीकडे या आंदोलनाचे पडसाद थेट प्रवाशांवर पडतील, असे बोलले जातं होते. मात्र चित्र काहीच वेगळ समोर आलं असून सकारात्मक प्रतिसाद प्रवाशांचा दिसून येत आहे. आनंदाची बाब म्हणजे दररोज १४ हजार बसगाड्या मार्गांवर धावत असून दररोजचे उत्पन्न १७ कोटींवर पोहचले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १ एप्रिल ते १५ मे या दीड महिन्यांतच लालपरीला ५२१ कोटींचे उत्पन्न मिळाले असल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत हाती येत असलेल्या माहितीनुसार, मागील १५ दिवसांत प्रवाशांची संख्या वाढल्याने मार्गांवर धावणाऱ्या बसगाड्यांमध्ये सोळाशेंची वाढ झाली आहे.

तर दुसरीकडे या १५ दिवसांतच लालपरीला २२९ कोटींपर्यंत उत्पन्न मिळाले आहे. याचबरोबर २२ एप्रिलपासून बहुतेक कर्मचारी कामावर हजर झाले असून सध्या ९१ हजार कर्मचारी रुजू झाले आहेत. यामुळे सर्वसामान्य प्रवाशांचा अजूनही तितकाच विश्वास असल्याचे लालपरीने पुन्हा एकदा सिध्द केले आहे.

दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांच्या बेकायदा संपामुळे एसटीची प्रवासी सेवा सहा महिने बंद होती. याचा एसटी महामंडळाला जबर फटका बसला. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सहा महिन्यांत प्रवासी वाहतुकीचा तब्बल २,८२४ कोटी सहा लाख ९१ हजारांचा महसूल बुडाला.

महत्त्वाच्या बातम्या
आजी – माजी मुख्यमंत्री आखड्यात! मुख्यमंत्र्यांच्या विराट सभेवर बरसले फडणवीस; ‘असा’ केला पलटवार
मोठी बातमी! ‘या’ महीन्यात मुंबई सहावेळा पाण्याखाली जाणार; हवामान विभागाचा अलर्ट
काकूची हातसफाई! दुकानातील गर्दीतून असा मोबाइल चोरला, व्हिडिओ बघून विश्वास बसणार नाही
सत्ता आल्यानंतर काँग्रेस घालणार EVM वर बंदी; काँग्रेसचा मोठा निर्णय

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now