Share

‘ग्रीन टी मधून गुंगीचे औषध देऊन…’, श्रीकांत देशमुखांचा मोठा खुलासा

भाजपचे सोलापूरचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख सध्या चर्चेत आले आहेत. श्रीकांत देशमुख यांचा एका महिलेसोबतचा बेडरूममधील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. श्रीकांत देशमुख यांना भाजपच्या(BJP) सोलापूर जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.(Srikant Deshmukh’s big revelation on viral video)

भाजपचे सोलापूरचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आपल्याला राजकीय विरोधकांकडून अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे श्रीकांत देशमुख यांनी राजीनामा देताना सांगितले आहे. तसेच महिलेने मला ग्रीन टी मधून गुंगीचे औषध दिले, असा आरोप देखील भाजपचे सोलापूरचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी केला आहे.

महिलेने मला ग्रीन टी मधून गुंगीचे औषध देऊन माझा आक्षेपार्ह व्हिडिओ तयार केला. या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्यावर चारित्र्यहननाचा प्रयत्न करण्यात आल्याचे भाजपचे सोलापूरचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी सांगितले. राजकीय विरोधकांकडून मला अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय, असा आरोप माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी केला आहे.

https://twitter.com/AjaySakat14/status/1546828031536156672?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1546828031536156672%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fmulukhmaidan.com%2Fbjp-shrikant-deshmukh-video-viral-on-social-media%2F

काही दिवसांपूर्वी भाजपचे सोलापूरचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी आपल्याला हनीट्रॅपमध्ये अडकवल्याची तक्रार पोलिसांकडे केली होती. यानंतर मंगळवारी श्रीकांत देशमुख यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओच्या माध्यमातून एका महिलेने श्रीकांत देशमुख यांच्यावर फसवणुकीचे आरोप केले होते.

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक महिला कॅमेऱ्यासमोर रडताना दिसत आहे. या महिलेच्या गळ्यात मंगळसूत्र देखील आहे. त्यानंतर ही महिला कॅमेरा फिरवते. त्यावेळी एक व्यक्ती बनियनवर आलिशान बेडवर बसलेला दिसतो. त्यावेळी ती महिला म्हणते की, “हा जो माणूस आहे. या माणसाने मला फसवलं आहे. हा बायकोबरोबर संबंध ठेवून माझ्याशी संबंध ठेवतोय. लग्न करतोय हा.”

व्हायरल व्हिडिओमध्ये महिला पुढे म्हणते की, “नाही. आता तू बघच…तुला नाही सोडणार. तू माझ्याशी का खोटं बोलला. का खोटं बोलता? यानंतर कॅमेरा बंद होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर श्रीकांत देशमुख यांच्यावर जोरदार टीका होत आहे. यामुळे श्रीकांत देशमुख यांनी सोलापूर ग्रामीणच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.

महत्वाच्या बातम्या :-
रोहित शर्माच्या सिक्सरने चिमुकली झाली जखमी, नंतर हिटमॅनने दिले तिला ‘हे’ खास गिफ्ट
मातोश्रीबाहेर मृत्यू झालेल्या शिवसैनिकासाठी एकनाथ शिंदे आले धावून, केली मोठी मदत
गुरुपौर्णिमेच्या दिवशी शुभेच्छा देताना एकनाथ शिंदे धनुष्यबाणालाच विसरले, पोस्टर झाला व्हायरल

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now