Share

‘या’ अभिनेत्याच्या सांगण्यावरून श्रीदेवीने बोनी कपूर यांना बांधली होती राखी, नंतर त्यांच्याशीच केलं लग्न

बॉलीवूडची प्रसिद्ध आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीने (Sridevi) आपल्या दमदार शैलीने आणि अभिनयाने इंडस्ट्रीमध्ये ठसा उमटवला होता. तिने आपल्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिच्या सौंदर्याचे चाहते खूप वेडे असायचे. पण अचानक 24 फेब्रुवारी 2018 रोजी श्रीदेवीने जगाचा निरोप घेतला, तिच्या निधनाने इंडस्ट्रीसह चाहत्यांनाही धक्का बसला. त्याच वेळी, चित्रपटांव्यतिरिक्त, श्रीदेवी तिच्या लव्ह लाईफबद्दल खूप चर्चेत होती, तिच्या अफेअरच्या चर्चा देखील जोरदार होत्या.(Sridevi had Rakhi tied on Bonnie Kapoor’s wrist)

अभिनेता जितेंद्रला श्रीदेवी खूप आवडायची, ती त्यांची मोठी फॅन होती. अभिनेत्रीने तिच्या करिअरच्या यशाचे श्रेय जितेंद्रला दिले होते. खरे तर जितेंद्रच्या सांगण्यावरूनच तिला ‘हिम्मतवाला’ या सुपरहिट चित्रपटात कास्ट करण्यात आले होते. यानंतर श्रीदेवी जितेंद्रवर फिदा होती, पण जेव्हा जितेंद्रची पत्नी शोभा हिला याची माहिती मिळाली तेव्हा त्या खूप संतापल्या. नंतर शोभाने श्रीदेवीला तिच्या घरी बोलावून समजावले.

त्याचबरोबर श्रीदेवी आणि मिथुन चक्रवर्ती यांच्या अफेअरचीही इंडस्ट्रीत जोरदार चर्चा झाली. दोघांनी गुपचूप लग्न केल्याचे बोलले जात आहे. इतकेच नाही तर जवळपास तीन वर्षे त्यांच्या लग्नाची माहिती कोणालाच मिळाली नाही. दुसरीकडे मिथुन चक्रवर्तीला पत्नी योगिता बालीपासून घटस्फोट घ्यायचा नव्हता, त्यामुळे दोघेही वेगळे झाले.

दरम्यान, श्रीदेवीच्या आयुष्यात बोनी कपूरची एन्ट्री होते. बोनी कपूरने जेव्हा श्रीदेवीला पहिल्यांदा पाहिले तेव्हा तो तिच्या प्रेमात पडला होता. अनेकदा बोनी त्याच्याशी जवळीक वाढवण्याचा प्रयत्न करत असत, जे मिथुन चक्रवर्ती यांना सहन होत नव्हते. त्यांनी बोनी कपूर यांना अनेकवेळा श्रीदेवीपासून दूर राहण्याची धमकीही दिली होती.

नंतर श्रीदेवी आणि बोनी कपूर यांना एकत्र पाहून मिथुन चक्रवर्ती इतके नाराज झाले की त्यांनी बोनी कपूर यांना अभिनेत्रीला राखी बांधायला लावली. बोनी कपूर यांची पहिली पत्नी मोना शौरी हिनेही याला दुजोरा दिला आहे. या घटनेमुळे इथेही त्यांची लव्ह स्टोरी सुरु झाली नाही.

दुसरीकडे, श्रीदेवीचे आयुष्य चढ-उतारांनी भरलेले होते. वडिलांच्या मृत्यूनंतर ती प्रचंड खचून गेली आणि तिच्या आयुष्यात काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करू लागली. त्यावेळी बोनी कपूरने तिला साथ दिली. यानंतर दोघे जवळ येऊ लागले आणि बराच काळ एकमेकांसोबत राहिल्यानंतर श्रीदेवी आणि बोनी कपूर यांनी 2 जून 1996 रोजी लग्न केले.

महत्वाच्या बातम्या-
शशी कपूर यांचा जुना व्हिडीओ होतोय व्हायरल, पत्नीबद्दल म्हणाले असं काही की भावनिक झाले लोक
वारं पठ्ठ्या! मार्कशीटमधील एका गुणासाठी बोर्डाला खेचलं हायकोर्टात, तीन वर्षांनी आला हा निकाल
पावनखिंडचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, ७ दिवसांत तब्बल एवढे कोटी कमवत पाडला नोटांचा पाऊस
गुन्हा दाखल झाल्यावर वानखेडेंचा अनोखा युक्तिवाद; म्हणाले, मी अल्पवयीन होतो, आईने सही करायला सांगितली होती

बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now