Share

श्रीदेवीला अमिताभ यांच्यासोबत करायचे नव्हते काम, मग बिग बींनी लढवली होती ‘ही’ शक्कल

श्रीदेवी(Sridevi) हिंदी चित्रपटसृष्टीतील अशी अभिनेत्री आहे जिच्यासोबत प्रत्येक बॉलिवूड कलाकाराला काम करायचे होते. तिच्या चित्रपटांच्या यशामुळे श्रीदेवीला लेडी अमिताभ असे संबोधले जात होते, परंतु एकदा असे घडले की अभिनेत्रीने अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan) यांच्यासोबत काम करण्यास तिने नकार दिला. बॉलिवूडमध्ये स्टार्सशी संबंधित, चित्रपटांशी संबंधित, चित्रपट निर्मितीशी संबंधित अनेक आंबट-गोड किस्से आपल्याला ऐकायला मिळतात. आज आम्ही तुम्हाला श्रीदेवी आणि अमिताभ यांच्याशी संबंधित हा रंजक किस्सा सांगणार आहोत.(Sridevi didn’t want to work with Amitabh)

See the source image

श्रीदेवीने 80-90 च्या दशकात ‘जुली’, ‘सोलह सावन’, ‘नागिन’, ‘हिम्मतवाला’, ‘चांदनी’ सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट करून बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचे नाव कमवले होते. ‘नागिन’ ‘चांदनी’ या चित्रपटात श्रीदेवीने आपल्या सुंदर अभिनयाने एवढा डान्स केला की आजही या चित्रपटांच्या गाण्यांवर मुली नाचताना दिसतात. एक काळ असा होता की सर्वोत्तम अभिनेत्री श्रीदेवी यांच्या नावावर चित्रपट चालत असत.

See the source image

प्रेक्षक फक्त श्रीदेवीला पाहण्यासाठी सिनेमागृहात जात असत. यशाच्या शिखरावर असताना श्रीदेवीने अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्यास नकार दिला. यामागे कोणतेही वैयक्तिक वैर नव्हते, पण ज्या चित्रपटात अमिताभ बच्चन आहेत, त्या चित्रपटातील अभिनेत्री केवळ शोपीस बनते, तिला काही विशेष महत्व नाही असे श्रीदेवीला वाटले.

अशा परिस्थितीत जेव्हा सुप्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक मुकुल आनंद यांनी ‘खुदा गवाह’ हा चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला तेव्हा अमिताभ म्हणाले की, या चित्रपटात मला श्रीदेवीची नायिका हवी आहे. यापूर्वी बिग बींनी ‘इंकलाब’ आणि ‘आखरी रास्ता’ यांसारख्या सुपर-डुपर हिट सिनेमांमध्ये काम केले होते. अमिताभ आणि श्रीदेवीची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली.

या चित्रपटात श्रीदेवी असेल तर चित्रपट यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही हे अमिताभ यांना माहीत होते. अमिताभ बच्चन यांनाही माहित होते की, श्रीदेवीला त्यांच्यासोबत चित्रपट करायचा नाही. अशा स्थितीत अमिताभ यांनी असा अप्रतिम मार्ग स्वीकारला की इच्छा असूनही श्रीदेवी चित्रपट करण्यास नकार देऊ शकल्या नाहीत.

त्यावेळी श्रीदेवी फिरोज खानसोबत गाण्याचे शूटिंग करत असल्याचे अमिताभ यांना माहीत होते. अमिताभ यांनी त्यांच्या शूटिंग लोकेशनवर गुलाबांनी भरलेला ट्रक पाठवला. श्रीदेवीसमोर गुलाबांनी भरलेला ट्रक टाकण्यात आला. श्रीदेवी इतकी खूश होती की तिने ‘खुदा गवाह’ करायला होकार दिला आणि अमिताभची युक्ती कामी आली.

महत्वाच्या बातम्या
नाद खुळा! ६ लाख खर्चून शेतकऱ्याने घरावर बसवला खराखुरा ट्रॅक्टर; ‘हे’ आहे कारण…
शाहरूख खानसाठी उर्मिला मातोंडकर मैदानात, म्हणाली, ‘याला थुंकणे नाही फुंकणे म्हणतात’
वडिलांच्या निधनानंतर सुरेश रैनावर कोसळला दु:खाचा डोंगर; म्हणाला, वडील गमावल्यानंतर माझी..
“किरीट सोमय्यांचे हात पाय तोडा; दोन-चार महिने उठले नाही पाहिजेत”

बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now