Share

वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलेकडे सापडला एसपीचा मोबाईल, अटक झाल्यावर केला धक्कादायक खुलासा

बिहारमधील मधेपुरा येथून एक खळबळजनक घटना समोर आली असून, त्यामुळे पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. वेश्या पुरवणाऱ्या महिलेकडून मधेपुरा जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक यांचा मोबाईल फोन जप्त करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. पकडल्यानंतर महिलेने पोलिस अधिकाऱ्यांबाबत अनेक मोठे खुलासे केले आहेत.

महिलेने सांगितले की, तिने एका मुलीला डीएसपी मुख्यालयाच्या घरी पाठवले होते. तिनेच एसपीचा मोबाईल चोरून त्यांना दिला. खरं तर, सध्या हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. कारण व्हिडिओमध्ये महिला दावा करत आहे की, ती पोलिस अधिकाऱ्यांना मुलींचा पुरवठा करते.

व्हायरल व्हिडिओमध्ये महिलेने सांगितले की, तिने एका मुलीला डीएसपी मुख्यालयाच्या घरी चार वेळा पाठवले आहे. पैशाबाबत माहिती देताना महिलेने सांगितले की, ती मुलीला ३०० रुपये प्रति तास दराने एसपीकडे पाठवते. जास्त काळ ठेवण्यासाठी ५०० रुपये दर असल्याची चर्चा होती.

माहितीनुसार, मधेपुराचे एसपी राजेश कुमार रजेवर गेले होते, तेव्हा त्यांच्या जागी डीएसपी अमरकांत चौबे यांना एसपीचा पदभार मिळाला होता. यादरम्यान त्यांच्या निवासस्थानी एका कॉल गर्लला बोलावण्यात आले. अपेक्षित दर न मिळाल्याने संतापलेली तरुणी उशीखाली ठेवलेला मोबाईल घेऊन निघून गेली.

सोशल मीडियावर केल्या जात असलेल्या दाव्यानुसार, डीआयजींनी एसपी अमरकांत चौबे यांना फोन केला तेव्हा त्यांचा मोबाइल बंद होता. मग काय, डीआयजींनी मोबाईल नंबर सर्व्हेलन्सवर टाकला तेव्हा एसपीचे लोकेशन सहरसा सापडले. हे पाहून डीआयजीही हैराण झाले.

पोलिसांनी अँक्शन घेतली आणि तात्काळ मोबाईल फोन जप्त करण्यात आला. पोलिसांनी ज्या महिलेकडे मोबाईल सापडला तिला चौकशीसाठी आणले. त्यानंतर महिलेने जो खुलासा केला तो धक्कादायक आहे. मात्र, सध्या व्हायरल झालेल्या व्हिडिओबाबत कोणताही पोलीस अधिकारी बोलण्याचे टाळत आहे.

क्राईम

Join WhatsApp

Join Now