Share

क्रीडामंत्र्यांनी रणजी ट्रॉफीत घातला धुमाकूळ, वयाच्या ३६ व्या वर्षी ठोकले शतक, रचला इतिहास

बंगालचे क्रीडा मंत्री मनोज तिवारी (Manoj Tiwari) यांनी शुक्रवारी ८८ वर्षात रणजी ट्रॉफीमध्ये इतर कोणीही करू शकले नाही अशी कामगिरी करून राज्याचे क्रीडा मंत्री म्हणून शतक झळकावणारे पहिले खेळाडू ठरले. झारखंडविरुद्धच्या पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर बंगालने उपांत्य फेरीत धडक मारली. पाचव्या दिवसाचा खेळ केवळ औपचारिकता होता ज्यात तिवारीने १३६ धावा केल्या.(Manoj Tiwari, Ranji, Bengal, Jharkhand)

आपल्या क्षेत्राशी संबंधित फायलींवर स्वाक्षरी करण्याबरोबरच तिवारीने मैदानावर आपले फलंदाजीचे कौशल्य दाखवत आपल्या खेळीत १९ चौकार आणि २ षटकार मारले. शाहबाज अहमदने ४६, अनुस्तुप मजुमदारने ३८ आणि अभिषेक पोरेलने ३४ धावा केल्या. या तिघांनीही पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारली होती. एकतर्फी उपांत्यपूर्व फेरीत बंगालने पहिल्या डावात ७ बाद ७७३ धावा केल्या आणि त्यांच्या नऊ फलंदाजांनी अर्धशतके झळकावून प्रथम श्रेणी क्रिकेटच्या २५० वर्षांच्या इतिहासात नवा विक्रम नोंदवला.

झारखंडकडून शाहबाज नदीमने ५९ धावांत ५ बळी घेतले. पहिल्या डावात विराट सिंगने १३६ धावा केल्या. उपांत्य फेरीत बंगालचा सामना मध्य प्रदेशशी होणार आहे. दुसऱ्या उपांत्य फेरीत मुंबईचा सामना उत्तर प्रदेशशी होणार आहे. हे दोन्ही सामने १४ जूनपासून होणार आहेत. ३६ वर्षीय बंगालचा माजी कर्णधार विधानसभा निवडणुकीपूर्वी टीएमसीमध्ये सामील झाला होता.

२०२१ मध्ये त्यांनी शिबपूर मतदारसंघातून भाजपच्या रथीन चक्रवर्ती यांचा पराभव करून विजय मिळवला होता. मनोज सध्या ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील पश्चिम बंगाल सरकारमध्ये क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री आहेत. याआधी २०२१ मध्ये, रणजी करंडक स्पर्धा पुढे ढकलण्यापूर्वी २१ सदस्यीय बंगाल संघात त्यांचा समावेश करण्यात आला होता. २०२० मध्ये सौराष्ट्र विरुद्ध बंगालच्या रणजी ट्रॉफी फायनलमध्येही त्यांचा सहभाग होता.

तिवारी यापूर्वी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२१ मध्ये खेळले होते. २०१५ मध्ये त्यांनी भारताकडून शेवटचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला होता. त्यांनी टीम इंडियासाठी १२ एकदिवसीय आणि ३ टी-२० सामने खेळले. तिवारी यांनी १२५ प्रथम श्रेणी सामने आणि १६३ लिस्ट ए सामने खेळले आहेत, त्यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये १४,००० हून अधिक धावा केल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-
मुंबईच्या खेळाडूने रणजीत घातला धुमाकूळ, आतापर्यंत झळकवली सात शतकं; रोहित-राहूल कधी घेणार दखल
प्रेमाच्या खेळपट्टीवर पृथ्वी शॉ बोल्ड, प्राची सिंहसोबत झालं ब्रेकअप, वाचा कोण आहे प्राची सिंह?
सिद्धू मुसेवालाचा पुण्यातील मारेकरी फक्त 23 वर्षांचा, आई म्हणते.. मी मुलाला पाठिशी घालणारी नाही
सिद्धू मुसेवालाच्या आठवनीत नायजेरियन रॅपरने केले असे काही की…; किस्सा वाचून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल

 

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now