Share

RRR चित्रपटातील शोले गाण्यात ‘वीर मराठा’ म्हणत शिवरायांचा तुफान जयजयकार; पहा व्हिडीओ

RRR

‘बाहुबली’ फेम दिग्दर्शक एस. एस. राजमौली दिग्दर्शित ‘आरआरआर’ (RRR) हा बहुप्रतिक्षित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दीर्घकाळापासून हा चित्रपट चर्चेत आहे. तर येत्या २५ मार्च रोजी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार असून नुकतीच या चित्रपटातील शोले हे गाणं रिलीज करण्यात आलं आहे. या गाण्यात देशाच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण व्यक्तींना मानवंदना देण्यात आली आहे. यामध्ये ‘वीर मराठा शोले’ म्हणत शिवाजी महाराजांचाही जयजयकार करण्यात आला आहे.

टी-सीरीजने हे गाणं रिलीज केलं असून ‘आरआरआर सेलिब्रेशन अँथम’ असे गाण्याचे नाव आहे. यामध्ये रामचरण, ज्यूनियर एनटीआर आणि आलिया भट्ट यांचा जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर या गाण्याला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. हिंदी वर्जनमधील या गाण्याला आतापर्यंत ४३ लाखापेक्षा अधिक व्यूज आणि ३ लाखापेक्षा अधिक लाईक्स मिळाले आहेत.

या गाण्यात एनटीआर, आलिया आणि रामचरण पारंपारिक वेशभूषेत दिसून येत आहेत. तसेच गाण्यात सर्वजण स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज, भगतसिंग, नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल अशा अनेक क्रांतिकारकांना मानवंदना देताना दिसून येत आहेत. यामध्ये जेव्हा रामचरण आणि ज्यूनियर एनटीआर छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देत आहेत तेव्हा तो दृश्य पाहून अंगावर काटा आल्याची भावना अनेकजण कमेंटद्वारे व्यक्त करत आहेत.

दरम्यान, ‘आरआरआर’ हा चित्रपट कोमरम भीम आणि अल्लूरी रामराजू या दोन क्रांतिकारकांवर आधारित आहे. या दोन क्रांतिकारकांनी ब्रिटीश राजवट आणि हैदराबाद निजामविरोधात लढा दिला होता. ज्यूनियर एनटीआर या चित्रपटात कोमरम भीम यांच्या भूमिकेत तर रामचरण अल्लूरी सीतारामराजू यांच्या भूमिकेत आहे. बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट या चित्रपटात अल्लूरी रामराजू यांच्या पत्नी अल्लूरी सीता रामराजू यांची भूमिका साकारत आहे.

या तिघांशिवाय चित्रपटात अजय देवगन, समुथिरकानी, ओलिविया मॉरिस, एलिसन डूडी, रे स्टीवेन्सन आणि श्रिया सरनही मुख्य भूमिकेत आहेत. तेलुगूसोबत हा चित्रपट तमिळ, मल्याळम, कन्नड आणि हिंदी भाषेतही प्रदर्शित होणार आहे. डीवीवी एंटरटेनमेंट्सद्वारा चित्रपटाची निर्मिती करण्यात येत असलेल्या या चित्रपटाकडून निर्मात्यांना खूप अपेक्षा आहेत. हा एक मेगा बजेट चित्रपट असून चित्रपट बाहुबली चित्रपटाचे रेकॉर्ड तोडेल, अशी अपेक्षा निर्मात्यांना आहे.

एस. एस. राजमौली यांच्या ‘आरआरआर’ चित्रपटाचे नॉर्थ इंडियन राईट्स १४० कोटी रूपयांना विकले गेले. या डीलसोबत चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच ८९० कोटी रूपयांचा बिझनेस केला आहे. त्यामुळे प्रदर्शनानंतरही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सर्व रेकॉर्ड तोडेल, अशी अपेक्षा निर्मात्यांना आहे.

महत्त्वाच्या बातम्या :
प्रसिद्ध निर्मात्याने काश्मिर फाईल्ससाठी रिकामे केले थिएटर; म्हणाला, ‘राष्ट्र प्रथम, माझा सिनेमा नंतर’
द कश्मीर फाइल्स: काश्मिरी पंडितांच्या पलायनाला नक्की कोण जबाबदार? काँग्रेस की जगमोहन?
प्रभासचा राधे श्याम चित्रपट पाहिल्यानंतर चाहत्याने घेतला गळफास, धक्कादायक कारण आले समोर

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now