‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटाच्या यशानंतर बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) सतत चर्चेत आहे. आलिया तिच्या चित्रपटांसोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही खूप चर्चेत असते. आलिया भट्ट आजच्या काळात बॉलीवूडची खूप मोठी आणि महान अभिनेत्री बनली आहे आणि आलिया भट्टचे बॉलिवूडमध्ये मोठे नाव आहे. कारण आलियाने बॉलीवूडला आतापर्यंत अनेक हिट आणि सुपरहिट चित्रपट दिले आहेत.(special-relation-between-aliya-bhatt-and-imrahn-hashmi)
आलिया भट्टच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर सध्या आलिया भट्ट रणबीर कपूरला डेट करत आहे आणि लवकरच लग्न करणार आहेत. अभिनेत्रीच्या लव्ह लाईफपासून तिच्या सहकलाकारांसोबतच्या बाँडिंगपर्यंत सोशल मीडियावर चर्चा होत आहेत, पण आलिया भट्ट आणि बॉलिवूड सीरियल किसर इमरान हाश्मी यांच्यात खास नाते आहे हे फार कमी लोकांना माहीत आहे.
बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी आणि आलिया भट्ट यांच्यात भावा-बहिणीचं नातं आहे. दोघे चुलत भाऊ-बहीण आहेत. इमरान हाश्मीचे वडील म्हणजेच अन्वर हाश्मी हे अभिनेत्री पूर्णिमा दास वर्मा (खरे नाव मेहराबानो अली) यांचा मुलगा आहे. पौर्णिमा दास यांची बहीण शिरीन मोहम्मद ही चित्रपट दिग्दर्शक महेश आणि मुकेश भट्ट यांची आई आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर इमरान हाश्मीची आजी आणि आलिया भट्टची आजी या सख्या बहिणी होत्या. त्यानुसार इमरान हाश्मी आणि आलिया भट्ट चुलत भाऊ आणि बहिणी आहेत.
इमरान हाश्मीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, या अभिनेत्याने बॉलिवूडमध्ये 18 वर्षे पूर्ण केली आहेत. मर्डर, गँगस्टर, जन्नत यांसारख्या चित्रपटातून सीरियल किसरची ओळख मिळवलेल्या इमरान हाश्मीने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. आता या अभिनेत्याने आपली किसिंग किंगची ओळख मागे टाकली आहे आणि अॅक्शन आणि सस्पेन्स चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली आहे.
दुसरीकडे, आलिया भट्टच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, अभिनेत्रीचा गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. गंगूबाईनंतरही या अभिनेत्रीकडे अनेक मोठे चित्रपट आहेत. अभिनेत्रीचा चित्रपट RRR देखील मार्च 2022 मध्ये प्रदर्शित होणार आहे, त्यानंतर आलियाचा चित्रपट ब्रह्मास्त्र देखील 2022 च्या अखेरीस थिएटरमध्ये प्रदर्शित होईल.
महत्वाच्या बातम्या-
आसाराम बापू निर्दोष आहेत त्यांची सुटका करा; महिलादिनी नांदेडमधील महीलांनी काढला मोर्चा
फोटोग्राफरचा एक क्लिक आणि ‘त्या’ मुलीचं संपूर्ण आयुष्यच बदललं, वाचा फुगे विकणाऱ्या किसबूची कहाणी
‘आई कुठे काय करते’ मालिकेत मोठा ट्विस्ट; आशुतोषमुळे अरुंधतीच्या आयुष्यात येणार नवीन वादळ
अभिनेत्री जुई गडकरीला झालाय गंभीर आजार; पोस्ट शेअर करत म्हणाली, हळूहळू शरीरातील अवयव..