Share

शाहरूख खानच्या जवान चित्रपटात ‘या’ साऊथ सुपरस्टारची एन्ट्री, नाव वाचून म्हणाल, ‘जबरदस्त’

सध्या बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) त्याच्या आगामी ‘जवान’ चित्रपटाच्या तयारीत आहे. जवान या चित्रपटात शाहरुख खान अॅक्शन अवतारात दिसणार आहे. दिग्दर्शक अॅटली (Attlee) यांनी काही दिवसांपूर्वीच त्यांच्या जवान या चित्रपटाचा टीझर रिलीज केला होता, ते पाहून असे म्हणता येईल की, शाहरुख खानच्या चाहत्यांना तो पुन्हा एकदा त्याचा डॉन अवतार पाहायला मिळणार आहे.(Shahrukh Khan, Attlee, Jawan)

जवान या चित्रपटाची खास गोष्ट म्हणजे यामध्ये दक्षिणेतील अनेक कलाकारही दिसणार आहेत, ज्यांचे कास्टिंगचे काम सातत्याने सुरू आहे. अॅटली दक्षिणेतील अनुभवी कलाकारांना साइन करण्यात व्यस्त आहेत, जेणेकरून जवान चित्रपटाला पॅन इंडियामध्ये रिलीज होण्यात कोणतीही अडचण येऊ नये.

ताज्या बातम्यांवर विश्वास ठेवला तर दक्षिणेतील सुप्रसिद्ध अॅक्शन स्टार थलपथी विजय जवान चित्रपटात कॅमिओ करताना दिसणार आहे. थलपथी विजय आणि शाहरुख खान खूप चांगले मित्र आहेत. शाहरुख खान आणि थलपथी विजय यांनी अनेक अवॉर्ड फंक्शन्समध्ये स्टेजवर एकत्र डान्सही केला आहे.

दाक्षिणात्य प्रेक्षकांना या दोघांची जोडी खूप आवडते, त्यामुळे हे पाहणे रंजक ठरेल की हे दोन स्टार्स एकत्र आल्यावर थिएटरमध्ये काय धमाका होईल? शाहरुख खानच्या वर्क फ्रंट बद्दल बोलायचे झाले तर जवानासोबतच शाहरुख खानकडे पठाण आणि डंकी सारखे चित्रपट आहेत, ज्यात तो अभिनय करताना दिसणार आहे. या दोघांसोबत किंग खान रणबीर कपूरच्या ब्रह्मास्त्र आणि सलमान खानच्या टायगर ३ मध्येही दिसणार आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहरुख खान ब्रह्मास्त्र आणि टायगर ३ मध्ये कॅमिओ करताना दिसणार आहे. या दोन्ही चित्रपटांचे निर्माते आदित्य चोप्रा आणि करण जोहर आहेत, हे शाहरुख खानचे खूप चांगले मित्र आहेत, त्यामुळे किंग खानने त्याच्यामध्ये कॅमिओ करण्यास होकार दिला आहे. प्रेक्षक बऱ्याच कालावधीपासून शाहरुख खानची प्रतीक्षा करत होते, मात्र आता लवकरच त्यांची प्रतीक्षा संपणार आहे.

महत्वाच्या बातम्या-
मी Gay….; शाहरुख खानचा सोबत काम करणाऱ्या अभिनेत्रींसोबतच्या नात्याबाबत मोठा खुलासा
शाहरुख खानचा मॉन्स्टर लुक आला समोर , बहुचर्चित जवान चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित
मी गे नाही, त्यामुळे मी कोणत्याही मुलीसोबत झोपेन शाहरुख खानने केला होता मोठा खुलासा
शाहरुख खानच्या पठाण चित्रपटाच्या निर्मात्यांनी या OTT प्लॅटफॉर्मसोबत केला करार, किंमत वाचून थक्क व्हाल

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now