Har har mahadev | हर हर महादेव या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच त्याने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. प्रेक्षकांकडून या ट्रेलरला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. मराठीसह आणखी अनेक भाषांमध्ये हा चित्रपट रिलीज होणार आहे त्यामुळे देशातील वेगवेगळ्या भागातून या ट्रेलरविषयी प्रतिक्रिया येत आहेत.
या चित्रपटाच्या हिंदी आणि मराठी ट्रेलरला अवघ्या काही तासांतच २० लाखांहून अधिक व्हुज मिळाले आहेत. तसेच ट्विटरवरही हा चित्रपट ट्रेंड करत आहे. यावरून तुम्हाला लक्षात येईल की, या चित्रपटाने किती क्रेझ निर्माण केली आहे.
अनेक दिग्गज कलाकारांनीही ट्रेलर पाहिल्यानंतर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यामध्ये दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपतीचाही समावेश आहे. त्याने ट्विट करत या चित्रपटाची तोंडभरून स्तुती केली आहे. सुपरस्टार विजय सेतुपतीने या चित्रपटाचा तामिळ ट्रेलर ट्विटरवर शेअर केला आहे.
ट्रेलर शेअर करताना त्याने चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने ट्विटमध्ये लिहीले आहे की, मला हर हर महादेव या चित्रपटाचा ट्रेलर तुमच्याशी शेअर करताना खुप आनंद होत आहे. संपुर्ण टिमला माझ्याकडून शुभेच्छा! विजय सेतुपतीने ट्विट केल्यानंतर अनेक चाहत्यांनी त्याच्या या ट्विटला उदंड प्रतिसाद दिला आहे.
तसेच अनेकांनी त्याचे हे ट्विट रिट्वीटही केले आहे. दरम्यान, हर हर महादेव या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिजित देशपांडे यांनी केले आहे. सुबोध भावे हा शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर दुसरीकडे शरद केळकर हा बाजीप्रभू देशपांचे यांची भूमिका साकारणार आहे.
या दोघांसोबत अमृता खानविलकर, सायली संजीव, निशिगंधा वाड, अशोक शिंदे, मिलिंद शिंदे, हार्दिक जोशी, किशोर कदम, शरद पोंक्षे या कलाकारांच्याही या चित्रपटात महत्वाच्या भूमिका आहेत. येत्या २५ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
Happy to share #HarHarMahadev trailer. Congrats team.https://t.co/cwV8pI0dua
Movie releasing in cinemas on 25th October.@RajThackeray @SharadK7 @SubodhBhave_ @AmrutaOfficialK @unbollywood @ZeeStudios_ @SayaliSanjeev #HardeekJoshi @mgk0526 pic.twitter.com/zZReOqPHL2
— VijaySethupathi (@VijaySethuOffl) October 10, 2022
महत्वाच्या बातम्या
Tushar gandhi : राजकारणात काहीच अशक्य नाही! कम्युनिस्टांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेनेला दिला पाठिंबा, तुषार गांधीसुद्धा…
CPI : ठाकरेंची ताकद वाढणार; एकेकाळचा कट्टर विरोधक बनणार मित्र, ‘या’ पक्षाने दिला जाहीर पाठिंबा
World Cup: वर्ल्डकपआधी भारतीय संघाचा मोठा निर्णय; रोहित शर्मा ऐवजी केएल राहुलला केले कर्णधार
Eknath shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा भाजपला दणका; कोट्यवधींची कामं केली रद्द, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण