दाक्षिणात्य अभिनेता सुपरस्टार महेशबाबूचे (Maheshbabu) जगभरात करोडो चाहते आहेत. वयाच्या चौथ्या वर्षी महेशबाबूने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. सिनेसृष्टीतील एका मोठ्या घराण्यातील मुलगा असला तरी त्याने आपल्या अभिनय आणि मेहनतीच्या जोरावर त्याने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. आज महेशबाबू दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे.
टॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच महेशबाबू सर्वात महागड्या अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याच्या प्रत्येक चित्रपटासाठी महेश चांगलीच फी आकारतो. तसेच वैयक्तिक आयुष्यातही तो आलिशान जीवन जगतो. आलिशान घर, कार, डिझाईनर कपडे असे त्याचे जीवन एखाद्या महाराजापेक्षा काही कमी नाही.
महेशबाबूकडे अनेक कार्सचे कलेक्शनदेखील आहे. तर नुकतीच त्याने आणखी एक आलिशान कार खरेदी केली आहे. महेशने इलेक्ट्रिक ऑडी ई-ट्रॉन कार खरेदी केली असून याबाबत त्याने स्वतः सोशल मीडियाद्वारे माहिती दिली आहे. इन्स्टाग्राम हँडलवर त्याने कारसोबतचा एक फोटो शेअर केला आहे.
या फोटोसोबत त्याने लिहिले ‘एक स्वच्छ, हिरवळ आणि शाश्वत भविष्य घरी घेऊन आलो. ऑडीचा अनुभव घेण्यासाठी उत्सुक आहे’. रिपोर्टनुसार महेशने खरेदी केलेल्या या कारची किंमत भारतात १.०१ कोटी रूपये आहे. तर ही कार खरेदी करून महेश ऑडी कार असणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत समाविष्ट झाला आहे.
https://www.instagram.com/p/CcZoW2cv3tb/
दरम्यान, महेशबाबू लवकरच ‘सरकारू वारी पाटा’ या चित्रपटात दिसणार आहे. परशुराम पेटला यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून १२ मे रोजी सिनेमागृहात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे महेशबाबूची मुलगी सितारा घट्टमनेनी याद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे.
या चित्रपटात ‘पेनी’ नावाचे एक गाणं आहे. या गाण्यात सिताराने वडिलांसोबत डान्स केले आहे. तर या व्हिडिओला चाहत्यांनी खूप पसंती दिली. याशिवाय महेशबाबू लवकरच ‘बाहुबली’ फेम दिग्दर्शक एस. एस. राजमौली यांच्या आगामी चित्रपटात दिसणार आहे.
‘बाहुबली’ त्यानंतर आता ‘आरआरआर’ चित्रपटाला मिळालेल्या भरघोस यशानंतर राजमौली यांचा महेशबाबूसोबतचा हा चित्रपटदेखील हिट ठरेल का? हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे. असे असले तरी महेशबाबूचे चाहते मात्र, या चित्रपटासाठी खूपच उत्सुक आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
‘शूटिंग संपलं की मला सेटवरून हाकलून लावतात’, ‘जीव माझा गुंतला’मधील अभिनेत्रीचा मोठा खुलासा
रणबीर-आलियानंतर ‘ही’ मराठमोळी जोडी अडकणार लग्नबंधनात; लग्नाची तारीखही केली जाहीर
‘Indian Idol Marathi’ला मिळाले टॉप 5 स्पर्धक, ‘या’ दिवशी होणार विजेतेपदासाठी लढत, प्रेक्षक उत्सुक