Share

साऊथ मेगास्टार चिरंजीवी यांना कोरोनाची लागण; ट्विट करत दिली माहिती

Chiranjeevi Tested Positive For Corona

मागील काही दिवसांपासून सिनेसृष्टीतील अनेक कलाकरांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे.बॉलिवूडसोबत दक्षिणेकडील अनेक कलाकारही कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत. यादरम्यान आता दक्षिणेकडील आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्याला कोरोनाची लागण झाली आहे. तेलुगू सिनेसृष्टीतील मेगास्टार अशी ओळख असणारे अभिनेते चिरंजीवी यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली (Chiranjeevi Tested Positive For Corona) आहे. यासंदर्भात चिरंजीवी यांनी स्वतः सोशल मीडियाद्वारे माहिती दिली आहे.

चिरंजीवी यांनी ट्विटर हँडलद्वारे त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. त्यांनी ट्विट करत लिहिले की, प्रिय मित्रांनो, सर्व प्रकारची सावधगिरी बाळगूनही काल रात्री माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. मला कोरोनाचे सौम्य लक्षणे जाणवत असून मी स्वतःला क्वारंटाईन करून घेतलो आहे. त्यांनी पुढे लिहिले की, मागील काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी कोरोना चाचणी करून घेण्याची मी विनंती करत आहे. लवकरच परत येण्यासाठी अधिक वाट पाहू शकणार नाही.

चिरंजीवी यांची ही पोस्ट समोर येताच चाहते त्यांच्या ट्विटवर कमेंट करत त्यांना काळजी घेण्यास सांगत आहेत. तसेच ते लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. चाहत्यांसोबत अनेक सेलिब्रिटी मंडळीही कमेंट करत चिरंजीवी यांना लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.

चिरंजीवी यांचा भाचा आणि अभिनेता अल्लू अर्जूननेही कमेंट करत चिरंजीवी यांची प्रकृती लवकर सुधारण्यासाठी प्रार्थना केली आहे. त्याने लिहिले की, ‘तुम्ही लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करत आहे. तसेच लक्षणे खूपच सौम्य असल्याने थोडासा दिलासा आहे. तुम्ही लवकरात लवकर बरे व्हावे, ही सदिच्छा’.

 

अभिनेता ज्यूनियर एनटीआरने चिरंजीवी यांच्या ट्विटवर कमेंट करत लिहिले की, ‘सर तुम्ही लवकरात लवकर बरे व्हावे ही सदीच्छा. आशा आहे की, तुम्हाला लवकरच बरं वाटेल’. ‘मक्खी’ चित्रपट फेम अभिनेता नानी यानेही ट्विट करत चिरंजीवी यांना काळजी घेण्यास सांगितले आहे.

चिरंजीवी यांच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाल्यास लवकरच ते त्यांच्या आगामी ‘आचार्य’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटात त्यांच्यासोबत काजल अग्रवाल, रामचरण आणि सोनू सूद यासारखे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. ४ फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र, काही कारणांनी चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या :
Video: अल्लू अर्जुनची पत्नी गोवाच्या बीचवर करतीये धमाल, सोशल मिडीयावर व्हिडिओ झाले व्हायरल
ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांचं निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
लग्नानंतर पहिल्यांदाच बोल्ड अवतारात दिसली कतरिना कैफ; बिकीनी लुक पाहून चाहत्यांना फुटला घाम

बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now