दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा (Nayantara) आणि चित्रपट निर्माते विघ्नेश शिवन (Vighnesh Shivan) यांनी गुरुवारी मित्र आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली. नयनताराने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत गोड बातमी शेअर केली आणि गोंडस फोटोही शेअर केले. विघ्नेशने सोशल मीडियावर नयनतारासोबतचे फोटो शेअर केले आणि म्हटले की, “देवाच्या कृपेने आणि पालक आणि मित्रांच्या आशीर्वादाने आमचे लग्न झाले.” ही पोस्ट पुन्हा शेअर करत नयनताराने तिच्या आयुष्याची नवी सुरुवातही सांगितली.(Nayantara, Vighnesh Shivan, Lagnagath, Photo)
नयनतारा आणि विघ्नेश यांचे महाबलीपुरम येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये लग्न झाले. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन, मणिरत्नम, ऍटली, रजनीकांत, शाहरुख खान, चिरंजीवी, कमल हसन आणि समंथा रुथ प्रभू यांच्यासह सिनेविश्वातील अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते.
https://www.instagram.com/p/CelDHlah6G1/?utm_source=ig_web_copy_link
लग्नात नयनतारा लाल साडीत राणीपेक्षा कमी दिसत नव्हती. त्याच वेळी, वर राजा विघ्नेश देखील पारंपारिक पोशाखात दिसला. रणवीर सिंगने नयनताराच्या पोस्टचे अभिनंदन करत देव तुम्हाला आशीर्वाद देवो असे म्हटले आहे. तसेच चाहत्यांकडून त्यांच्या या फोटोला अनेक कमेंट्स आणि लाईक मिळाले आहे.
https://www.instagram.com/p/CelOevbBmZv/?utm_source=ig_web_copy_link
ऑनलाइन शेअर केलेल्या एका फोटोवरून असे दिसून आले आहे की, तिच्या खास दिवसासाठी नयनताराने प्रामुख्याने हिरव्या दगडाचे दागिने आणि लाल साडी निवडली होती. नयनतारा नववधूच्या रूपात अप्रतिम दिसत आहे. दुसरीकडे, विघ्नेशने त्याचा लूक क्रीम रंगाचा कुर्ता आणि पारंपारिक गोल्डन बॉर्डर वेष्टीसह पूर्ण केला. हे जोडपे मंडपात एकमेकांचा हात धरून बसलेले दिसत आहे.
https://www.instagram.com/p/CelNXpPBeU9/?utm_source=ig_web_copy_link
विघ्नेशने कपाळावर चुंबन घेतानाचा एक फोटो शेअर करत सोबत कॅप्शनमध्ये लिहिले की, 10 के पैमाने पर … वह नयन है और मैं एक हूं ..️ देवाच्या कृपेने, ब्रह्मांड, आमचे पालक आणि सर्वात चांगल्या मित्रांच्या आशीर्वादाने आम्ही शेवटी लग्न केले. #नयनतारा.” विघ्नेशने शेअर केलेल्या या फोटोला खूप लाईक केले गेले आहे. तसेच चाहते त्यांचे अभिनंदन करत आहेत.
https://www.instagram.com/p/CelLSlhhfTW/?utm_source=ig_web_copy_link
फोटो समोर येताच चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव झाला. एका चाहत्याने ट्विट केले, “अभिनंदन भाई शुभ विवाहित जीवन #WikkiNayan” दुसऱ्या एका चाहत्याने ट्विट केले, “अभिनंदन आणि शुभेच्छा.” तिसऱ्या चाहत्याने लिहिले, “#naanumrowdydhan हिरो आता #naanumhusbanddhan झाला आहे, अभिनंदन विकी भाई, तुमचे वैवाहिक जीवन आनंद आणि समृद्धी, भरपूर प्रेमाने भरले जावो.”
महत्वाच्या बातम्या-
३ मुलांचा बाप असलेल्या प्रभुदेवाच्या प्रेमात वेडील होती ही अभिनेत्री, त्याच्या पत्नीला दिले होते कोट्यावधींचे गिफ्ट
शाहरुख खानच्या पठाण चित्रपटाच्या निर्मात्यांनी या OTT प्लॅटफॉर्मसोबत केला करार, किंमत वाचून थक्क व्हाल
या साऊथ अभिनेत्रींचे MMS झाले होते लीक; दिसून आल्या होत्या आक्षेपार्ह स्थितीत
राजकुमार हिरानींच्या चित्रपटात या लूकमध्ये दिसणार शाहरुख खान; बाबा सिद्दीकीच्या इफ्तार पार्टीमध्ये झाला खुलासा






