Share

VIDEO: झुंड पाहिल्यानंतर धनुषही झाला भावूक, म्हणाला, ‘चित्रपटातील मुलांनी माझं मन जिंकून घेतलं’

jhund

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन अभिनित ‘झुंड’ (Jhund) हा चित्रपट उद्या सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. आपल्या दिग्दर्शनासाठी तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. नुकतीच बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने हा चित्रपट पाहून चित्रपटाचे आणि नागराज मंजुळे यांचे भरभरून कौतुक केले. त्यानंतर आता दाक्षिणात्य अभिनेता धनुषनेही या चित्रपटाचे तोंडभरून कौतुक केले (Dhanush About Jhund) आहे.

अभिनेता धनुषसाठी ‘झुंड’ चित्रपटाचं स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आलं होतं. यावेळी चित्रपटाची स्तुती करताना धनुषने म्हटले की, ‘कुठुन सुरुवात करावी, हेम मला कळेना. अतिउत्तम. खरंच खूपच उत्कृष्ट चित्रपट आहे. चित्रपटातील भावना प्रत्येकाचं मन जिंकून घेतात. प्रत्येकाने हा अनुभव घेतला पाहिजे. हा एक मास्टरपीस चित्रपट आहे’.

पुढे धनुषने म्हटले की, ‘चित्रपटाच्या माध्यमातून नागराज यांनी एक खास संदेश दिला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांचा आवाज प्रत्येकांपर्यंत पोहोचला पाहिजे. दुर्लक्ष करता येणार नाही, असे त्यांचे काम आहे. चित्रपटातील मुलांनी माझं मन जिंकून घेतलं असून माझ्याजवळ बोलण्यासाठी शब्द नाहीत. चित्रपट पाहून मी निःशब्द झालो आहे’.

‘चित्रपट सर्वांचे लक्ष वेधून घेईल, यात शंका नाही. अमिताभ सर यांचं काम अद्भुत आहे. चित्रपटाच्या संपूर्ण टीमनेही खूप चांगलं काम केलं आहे. असा चित्रपट दिल्याबद्धल नागराज मंजुळे यांना धन्यवाद. हा चित्रपट सुपरहिट होण्यासाठी मी नागराज मंजुळे, अजय-अतुल, भूषण कुमार तसेच चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा देतो’, असे धनुष या व्हिडिओत म्हणताना दिसत आहे.

दरम्यान, ‘सैराट’च्या अभूतपूर्व यशानंतर नागराज मंजुळे यांचा ‘झुंड’ हा पहिलावहिला हिंदी चित्रपट आहे. या चित्रपटाद्वारे ते हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहेत. हा चित्रपट समाजसेवक विजय बरसे यांच्या जीवनावर आधारित आहे. विजय बरसे हे एक निवृत्त क्रिडा शिक्षक होते. त्यांनी झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांना फुटबॉलची ट्रेनिंग दिली होती. तसेच त्यांनी ‘स्लम सॉकर’ नावाच्या एनजीओचीही स्थापना केली होती.

या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी विजय बरसे यांची भूमिका साकारली आहे. अमिताभ यांच्यासोबत या चित्रपटात ‘सैराट’ जोडी रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसरही मुख्य भूमिकेत आहेत. संगीतकार जोडी अजय-अतुल यांनी या चित्रपटाला संगीत दिलं आहे. तर उद्या ४ मार्च रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या :
‘कुत्र्यासोबत झोपलं तरी माझा पती मला मारायचा, झालं होतं ब्रेन हॅमरेज’, या अभिनेत्रीचा मोठा खुलासा
चित्रपट फ्लॉप झाला तरी राजकुमार वाढवायचे आपली फी, म्हणायचे, ‘चित्रपट फ्लॉप आहे मी नाही’,
‘पावनखिंड’ चित्रपटाला मिळालेले प्रेम पाहून भारावून गेला चिन्मय मांडलेकर; म्हणाला, ‘आम्ही धन्य झालो’

बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now