बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली यांची खुर्ची धोक्यात असल्याचे दिसते. गांगुलीला लवकरच बीसीसीआयमधून डिस्चार्ज दिला जाऊ शकतो, अशी माहिती मिळत आहे. त्याच्या व्यतिरिक्त, बोर्ड सचिव जय शाह यांचा ३ वर्षांचा कार्यकाळ ऑक्टोबर २०२२ मध्ये संपणार आहे.
अशा स्थितीत या दोघांच्या जागी बोर्डाचा नवा अध्यक्ष आणि सचिव नेमला जातो की गांगुली-शहा यांच्याकडे पुन्हा जबाबदारी येते, हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे. ऑक्टोबर-२०१९ मध्ये गांगुलीला बीसीसीआयचा अध्यक्ष बनवण्यात आले, त्याआधी तो बंगाल क्रिकेट असोसिएशनचा प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळत होता.
मिळाळलेल्या माहितीनुसार, सौरव गांगुली आणि जय शहा यांचा बीसीसीआयमधील कार्यकाळ ऑक्टोबरमध्ये संपणार आहे. ऑक्टोबरमध्ये जेव्हा दोघे आपला कार्यकाळ संपवतील, तेव्हा त्यांना पुन्हा बीसीसीआयमध्ये कायम ठेवले जाईल किंवा त्याऐवजी नवीन चेहरा येईल याची आता सर्वत्र चर्चा सुरू आहे.
दरम्यान, सौरव गांगुली बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची पदं पद सोडणार असून त्यांच्या जागी नव्या अध्यक्षाची जागा घेऊ शकतात. सौरव गांगुली ची २०१५ मध्ये बंगाल क्रिकेटच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. कॅबमधील त्यांचे चांगले काम लक्षात घेता त्यांना बीसीसीआयचे अध्यक्ष बनविण्यात आले.
तसेच विराट कर्णधारपदावरून पायउतार झाल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली. बीसीसीआय सचिव जय शाह यांनी देखील यावर भाष्य केले आहे.
ते म्हणतात, ‘भारतीय कसोटी संघाचा कर्णधार म्हणून विराट कोहलीचा कार्यकाळ अविश्वसनीय होता. त्यासाठी त्याचे अभिनंदन. विराटनं असा निडर संघ तयार केला की जो घरात आणि घराबाहेर कोणत्याही प्रतिस्पर्धीला टक्कर देण्याची धमक राखतो. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड येथे मिळवलेले कसोटी विजय हे खास आहेत.’
महत्त्वाच्या बातम्या
भाजपने शिवरायांचा पुतळा हटवल्याने मित्रपक्ष नाराज; पाठींबा काढत थेट राजीनामे दिले
अधिकाऱ्याच्या घरावर छापा; 7 BMW, मर्सिडीज,14 कोटी कॅश, सोन्या चांदीचे दागिने जप्त
ज्या खासदाराला मोदी सरकारने पद्मश्री पुरस्कार दिला तो निघाला चीनचा गुप्तहेर; जगभरात खळबळ
चीनच्या गुप्तहेराला मोदी सरकारने दिला पद्मश्री; देशाला हादरवून टाकणारी माहिती आली समोर