आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री उशिरा पुणे पोलीस आयुक्तालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शहरातील सर्व गणेशमंडळांचे प्रमुख आणि पोलीस आयुक्त यांची एकत्रित बैठक झाली. (Sound system can be played till 12 midnight during last 5 days of Ganeshotsav)
यावेळी ‘नियमांचे काटेकोरपणे पालन करू आणि येणारा गणेशोत्सव साजरा करू. गणेशोत्सवाच्या शेवटचे पाच दिवस रात्री बारापर्यंत ध्वनीवर्धकांना परवानगी असेल,’ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री उशिरा जाहीर केले.
मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, ‘पुण्यातील गणेशोत्सवाला ऐतिहासिक वारसा आहे. राज्यभरातील लोक हा उत्सव पाहण्यासाठी येतात. गणेश मंडळाच्या अनेक मागण्या होत्या. याबाबत मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी बैठक पार पडली.’
‘मंडळांना कोणतीही अडचण येणार नाही. याकडे जिल्हाधिकारी लक्ष देतील. न्यायालयाने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे विसर्जन मिरवणूक काढू. कोणत्याही नियमाला बाधा येणार नाही, याची खबरदारी घेतली जाईल,’ असे मुख्यमंत्री म्हणाले.
‘गणेशोत्सवाचे शेवटचे पाच दिवस रात्री बारापर्यंत उत्सव सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. अनेक सामाजिक मंडळं काम करत आहेत. तसेच दहीहंडी उत्सवासही परवानगी देण्यात आली आहे,’ असे यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी पुरंदरमधील सभेच्या निमित्ताने पुण्यात आले होते. तेव्हा पुण्यातील अनेक विकास प्रकल्पांबाबत संबंधित पदाधिकाऱ्यांशी त्यांची चर्चा झाल्याचे समजते.
महत्वाच्या बातम्या-
एकनाथ शिंदेचा पुण्यात येताच अजितदादांना धक्का; एका झटक्यात बदलला ‘तो’ निर्णय
Hrithik Roshan: रोशन पिता-पुत्राच्या जोडीने दिले अनेक हिट चित्रपट, पण ‘हे’ चित्रपट झाले इंटरनॅशनल फ्लॉप
Cancer: ह्रदयद्रावक! ठाण्यातील दिव्याचा मृत्यु, कॅन्सरशी लढताना १० वीत मिळवले होेत ८१.६० टक्के