Share

सोनू सूदची बहीण मालविका यांना पराभवाचा धक्का; भाऊ म्हणाला, ‘फोन नंबर याद है ना दोस्तों…?’

sonu sud

यंदाची पाच राज्यांची निवडणूक अनेक कारणांनी चर्चेचा विषय बनली होती. या निवडणुकीचा निकाल देखील गुरुवारी लागला आहे. यात भाजपने बाजी मारली असून कॉंग्रेसला मात्र प्रभावाचा सामना करावा लागला. तर दुसरीकडे अभिनेता सोनू सूदची बहीण देखील निवडणुकीच्या रिंगणात उभी होती.

यामुळे सर्वांचे लक्ष मोगा मतदारसंघाकडे लागलं होतं. अभिनेता सोनू सूदची (Sonu Sood) बहीण मालविका सूद सच्चरदेखील (Malvika Sood Sachar) निवडणुकीच्या रिंगणात उभ्या होत्या. मालविका पंजाबमधील मोगा मतदारसंघातून विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात उभ्या होत्या.

मात्र त्यांनाही या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. ‘आप’च्या उमेदवार अमनदीप कौर अरोरा यांच्यापुढे मालविकाचा निभाव लागला नाही. 20 हजारांहून अधिक मतांनी अमनदीप यांनी सोनू सूदची बहीण मालविकाचा निवडणूक रिंगणात पराभव केला.

तसेच बहिणीच्या पराभवानंतर सोनू सूदने पहिलं ट्विट केलं आहे. ‘खिलाफ कितने हैं ये जरूरी नहीं… साथ कितने हैं ये जरूरी है…मदद करने के लिए तो सिर्फ जज्बा चाहिए… जो कल भी था आज भी है और आगे भी रहेगा… फोन नंबर याद है ना दोस्तों…,’ असं यात लिहिलं आहे.

https://twitter.com/SonuSood/status/1502624618976219141?s=20&t=X7G3WjhiE70BMprM0hwv6A

सध्या सोनू सुदच्या या ट्विटची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. ‘मी आणि मालविका आम्ही आयुष्यभर तुमच्या सेवेसाठी तत्पर असू…,’असं त्याने या ट्विटमध्ये लिहिलं आहे. शिवाय या फोटोसोबत एक कविताही शेअर केली आहे. दरम्यान, सोनू सूदची (Sonu Sood) बहीण मालविका यांनी 10 जाणेवारी रोजी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

तसेच 38 वर्षीय मालविका सूद या अभिनेता सोनू सूदची सर्वांत लहान बहीण आहे. मालविकाने संगणक अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले असून त्या मोगा येथे इंग्रजी कोचिंक सेंटर चालवतात. यासोबतच त्यांनी मोगा येथे शिक्षण, रोजगार आणि आरोग्य क्षेत्रात काम केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या
राज ठाकरेंचं संजय राऊतांबद्दल मोठं विधान, राज्याच्या राजकारणात उडाली खळबळ
राहूल गांधींना अध्यक्ष करण्याची कार्यकर्त्यांची मागणी; कॉंग्रेसच्या बैठकीत राजीनामानाट्यानंतर हायहोल्टेज ड्रामा
कितीही प्रयत्न केला तरी डोळ्यातील अश्रू काही थांबत नाहीत, जवळच्या व्यक्तीच्या निधनाने प्राजक्ता गायकवाड भावूक
भगवंत मान यांच्या ‘त्या’ निर्णयाचे पवारांनीही केले स्वागत; राज्य सरकारलाही केले अनुकरन करण्याचे आवाहन

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now