Share

भर उन्हाळ्यात चाहत्याने केली थंडगार बिअरची मागणी, सोनू सुद म्हणाला, बिअरसोबत.., वाचून लोटपोट व्हाल

बॉलिवूडचा सुप्रसिध्द अभिनेता सोनू सुद सोशल मिडियावरील सर्वांत ॲक्टिव व्यक्तींपैकी एक आहे. लॉकडाऊमध्ये स्थलांतरित मजूरांना केलेल्या मदतीमुळे तर सोनू सुदचे नाव चांगलेच चर्चेत आले आहे. त्याने केलेल्या या मदतीनंतर आता लोक त्याच्याकडे वेगवेगळ्या मागण्या करताना दिसत आहेत. नुकतीच सोशल मिडीयावर एका नेटकऱ्याने सोनूकडे आगळीवेगळी मागणी केली आहे.

त्याच्या या मागणीवर सोनू सुदनेही हास्यस्पद उत्तर दिले आहे. या नेटकऱ्याने म्हटले आहे की, थंडीत चादर दान करणाऱ्यांनो आता उन्हाळ्यात थंड बिअर नाही पाजणार का.. त्याच्या या मागणीचे उत्तर देत, बीअरसोबत भुजिया चालेल का असे सोनू सुदने विचारले आहे. सोनू सुदची ही पोस्ट सोशल मिडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

https://www.facebook.com/100044510856363/posts/532103614949996/?d=n

त्याच्या या उत्तरावर चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान सोनू सुद सध्या रोडीज या टीव्ही शोमध्ये काम करताना दिसत आहे. नुकतेच त्याने शोच्या नवीन सीजनमध्ये होस्टींगचे काम हाती घेतले आहे. यावेळी त्याने म्हटले आहे की, मी रोडीजची शुटींग पुन्हा सुरु झाल्यामुळे खूप आनंदी आहे.

हा एक रिॲलिटी शो आहे. ज्याला मी कित्येक वर्षांपासून पाहत आलोय. त्यामुळे मी या शोमध्ये काम करण्यासाठी खूप एक्साइटेड आहे. दुसऱ्या बाजूला सोनू सुद लवकरच पृथ्वीराज या आगामी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटातील मुख्य भूमिकेत सोनू सुदसोबत अक्षय कुमार झळकणार आहे. हा चित्रपट हिंदी, तेलगू, तमिळ भाषेत प्रदर्शित होणार आहे.

त्यामुळे बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट चांगली कमाई करेल असे म्हटले जात आहे. लॉकडाऊनमध्ये सोनू सुदने गोरगरिबांना मोठ्या प्रमाणात मदत केली होती. याकारणानेच त्याचे नाव सगळीकडे चर्चेत आले होते. सोशल मिडियावर अनेकांनी पोस्ट लिहित सोनूचे आभार मानले होते. तसेच ही मदत सोनू सुद प्रसिध्दीसाठी करत असल्याची टीका काहींनी त्याच्यावर केली होती.

महत्वाच्या बातम्या
बायकोने धोका दिला, धोनीमुळे संघात मिळाली नाही जागा, तरीही हार न माननारा DK, वाचा प्रेरणादायी स्टोरी
पहिल्या ऑडिशनमध्ये असा होता रणवीर सिंगचा स्वॅग, व्हिडिओ पाहून तुम्हालाही आवरणार नाही हसू
संजय राऊतांनी ईडीचे केले समर्थन, ‘तो’ जुना व्हिडीओ दाखवत भाजप नेत्याने केली पोलखोल
”विराट कोहली, बाबर आझम आणि नऊ लाकडाचे तुकडे द्या, याच्यातच वर्ल्ड कप जिंकून दाखवेन”

ताज्या बातम्या बाॅलीवुड

Join WhatsApp

Join Now