यंदाची पाच राज्यांची निवडणूक अनेक कारणांनी चर्चेचा विषय बनली होती. या निवडणुकीचा निकाल देखील गुरुवारी लागला आहे. यात भाजपने बाजी मारली असून कॉंग्रेसला मात्र प्रभावाचा सामना करावा लागला. तर दुसरीकडे अभिनेता सोनू सूदची बहीण देखील निवडणुकीच्या रिंगणात उभी होती.
यामुळे सर्वांचे लक्ष मोगा मतदारसंघाकडे लागलं होतं. अभिनेता सोनू सूदची (Sonu Sood) बहीण मालविका सूद सच्चरदेखील (Malvika Sood Sachar) निवडणुकीच्या रिंगणात उभ्या होत्या. मालविका पंजाबमधील मोगा मतदारसंघातून विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात उभ्या होत्या.
मात्र त्यांनाही या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. ‘आप’च्या उमेदवार अमनदीप कौर अरोरा यांच्यापुढे मालविकाचा निभाव लागला नाही. 20 हजारांहून अधिक मतांनी अमनदीप यांनी सोनू सूदची बहीण मालविकाचा निवडणूक रिंगणात पराभव केला.
तसेच बहिणीच्या पराभवानंतर सोनू सूदने पहिलं ट्विट केलं आहे. ‘खिलाफ कितने हैं ये जरूरी नहीं… साथ कितने हैं ये जरूरी है…मदद करने के लिए तो सिर्फ जज्बा चाहिए… जो कल भी था आज भी है और आगे भी रहेगा… फोन नंबर याद है ना दोस्तों…,’ असं यात लिहिलं आहे.
https://twitter.com/SonuSood/status/1502624618976219141?s=20&t=X7G3WjhiE70BMprM0hwv6A
सध्या सोनू सुदच्या या ट्विटची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. ‘मी आणि मालविका आम्ही आयुष्यभर तुमच्या सेवेसाठी तत्पर असू…,’असं त्याने या ट्विटमध्ये लिहिलं आहे. शिवाय या फोटोसोबत एक कविताही शेअर केली आहे. दरम्यान, सोनू सूदची (Sonu Sood) बहीण मालविका यांनी 10 जाणेवारी रोजी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
तसेच 38 वर्षीय मालविका सूद या अभिनेता सोनू सूदची सर्वांत लहान बहीण आहे. मालविकाने संगणक अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले असून त्या मोगा येथे इंग्रजी कोचिंक सेंटर चालवतात. यासोबतच त्यांनी मोगा येथे शिक्षण, रोजगार आणि आरोग्य क्षेत्रात काम केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
तिसरे अपत्य असल्यामुळे महिलेला गमवावी लागली सरकारी नोकरी, न्यायालयाने दिला मोठा निर्णय
प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहता तीन राज्यांत ‘द काश्मिर फाईल्स’ करमुक्त, चित्रपटाने केली छप्परफाड कमाई
..म्हणून फडणवीसांचं राजकारण म्हणजे गांडूच राजकारण; प्रकाश आंबेडकरांची जहरी टिका
‘मिडीयाच्या जातीवादी वृत्तीमुळे बसपाचे प्रवक्ते टीव्ही डिबेटमध्ये घेणार नाही भाग’, मायावतींचा मोठा निर्णय