Share

VIDEO: सोनू सूद पुन्हा बनला देवदूत; अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला उचलून रुग्णालयात केले दाखल

एखाद्याचा जीव वाचवणे हे मानवतेचे सर्वात मोठे उदाहरण आहे. जीव वाचवणारा देवापेक्षा कमी नाही. बॉलीवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) खरंच लोकांसाठी ‘देव’ रूप आहे. अनेक वेळा सोनू सूद गरिबांना मदत करताना पाहायला मिळतो. या अभिनेत्याने केवळ अनेकांचे जीवनच बदलले नाही, तर अनेकांना नवजीवन देण्यातही मदत केली आहे. (Sonu Sood becomes angel again)

अनोळखी लोकांना मदत करण्यात आघाडीवर असलेला बॉलीवूड स्टार सोनू सूद याने आता पुन्हा एकदा जीव वाचवून आदर्श घालून दिला आहे. पंजाबमधील मोगा जिल्ह्यातील कोटकपुरा बायपास येथील घटना आहे. येथे एका व्यक्तीचा कार अपघात झाला. त्याचवेळी तेथून जात असलेल्या सोनू सूद याने हा अपघात पाहिल्यानंतर तो मदतीसाठी तिथेच थांबला.

2 वाहनांच्या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला सोनूने स्वतः बाहेर काढले आणि रुग्णालयात नेऊन उपचार केले. ही घटना मंगळवारी रात्री उशिरा घडली. मिळालेल्या माहितीनुसार, मोगाच्या कोटकपुरा बायपासवर दोन वाहनांचा अपघात झाला. सोनू सूद तिथून जाताच त्याला स्वतःला रोखता आले नाही. त्यांनी त्यांची कार थांबवली.

सोनू सूदने टीमच्या सदस्यांच्या मदतीने जखमी व्यक्तीला गाडीतून बाहेर काढले. त्याला आपल्या मांडीत उचलून आपल्या गाडीत बसवून दवाखान्यात नेऊन उपचार केले. मिळालेल्या माहितीनुसार, जखमी व्यक्तीची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे. त्या जखमी व्यक्तीसाठी सोनू सूद देवापेक्षा कमी नाही.

कोरोनाच्या काळात हजारो अनोळखी लोकांसाठी मसिहा बनलेल्या बॉलीवूड स्टार सोनू सूदने मोगा येथे एका मानवी जीव वाचवून पुन्हा एक आदर्श ठेवला आहे. सोनू आपल्या आयुष्यात इतकं अप्रतिम काम करत आहे की जेव्हा जेव्हा माणुसकीचा प्रश्न येतो तेव्हा सोनू सूदचं नाव सगळ्यात आधी घेतलं जातं आणि त्याच्या या उदात्त कृत्यांची पिढ्यानपिढ्या उदाहरणं दिली जातात. सोनू सूद तू खरंच खऱ्या आयुष्यात हिरो आहेस.

महत्वाच्या बातम्या-
डुग्गूच्या अपहरणकर्त्याचे पुणे पोलिसांनाच आव्हान, पोलिस चौकीपासूनच झाले होते अपहरण
‘ब्राह्मण ही जात नसून जगण्याचे उत्तम साधन आहे, जन्मापासून मरेपर्यंत सौभाग्यासाठी काम करतात’
मोठी बातमी! भर चौकात प्राध्यापिकेला जाळणाऱ्या तरुणाला न्यायालयाने ठोठावली जन्मठेप

मनोरंजन

Join WhatsApp

Join Now