मशिदीवरील भोंग्याच्या वादावरून राजकारण चांगलेच तापलेले आहे. आता या वादात सर्वसामान्य जनता देखील सहभागी झाल्याची दिसून येत आहे. शनिवारी संध्याकाळी सातारा परिसरातील एका मशिदीत नमाजाचे पठण होत असतानाच त्याठिकाणी भोंगे लावण्यात आल्याची घटना समोर आली होती.
नमाज पठणावेळी या भोंग्यावर हनुमान चालीसासह इतर धार्मिक गाणी वाजविण्यात आल्यामुळे पोलीस उपनिरीक्षक किशोर मलकूनाईक यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. परंतु आता या घटनेसंबंधित एक वेगळीच माहिती समोर आली आहे. मलकूनाईक यांनी बायकोच्या वाढदिवसानिमित्त लाऊडस्पीकर लावल्याचे उघडकीस आले आहे.
परळीत रेल्वे सुरक्षा बलात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या किशोर गंडप्पा मलकुनाईक यांनी २३ एप्रिलला संध्याकाळी बायकोच्या वाढदिवसानिमित्त घरी छोटेखानी पार्टी ठेवली होती. या पार्टी वेळीच त्यांनी घरात लाऊडस्पीकर लावला होता. या लाऊडस्पीकरवर त्यांनी गाणी देखील वाजवली होती.
मात्र याचवेळी मुस्लीम समाजाच्या अजानची वेळ झाली होती. त्यामुळे या लाऊडस्पीकरमुळे आम्हाला त्रास होत असल्याची तक्रार काही मुस्लीम बांधवांनी केली होती. त्यांनी केलेल्या या तक्रारीमुळे पोलीस मलकुनाईक यांच्या घरी दाखल झाले. यानंतर पोलिसांनी लाऊडस्पीकर जप्त केला.
या घटनेच्या दुसऱ्या दिवशी पोलिसांनी मलकुनाईक यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. दोन समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. मात्र आपला कोणच्याही भावना दुखावण्याचा हेतू नसल्याचे मलकुनाईक यांनी पोलिसांना म्हणले आहे.
तसेच, लाऊडस्पीकर लावल्यामुळे एवढे प्रकरण वाढू शकते, ही बाब मला माहीत असती तर मी गाणी वाजवली नसती असे मलकुनाईक यांनी म्हटले आहे. दरम्यान किशोर गंडप्पा मलकुनाईक यांच्यावर पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर भाजप कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे. याप्रकरणात सातारा येथील भाजप कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा चढविला आहे. त्यामुळे भोंग्याच्या वादावरून येथील परिसरात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
पोलीसांवर केलेले खोटे आरोप नवनीत राणांना महागात पडणार; पोलीस करणार मोठी कारवाई
बच्चू कडूंना धक्का, प्रकाश आंबेडकरांच्या ‘त्या’ आरोपांवर न्यायालयाने दिले गुन्हा दाखल करण्याचे आदेश
महाविकास आघाडीतील आणखी एक मंत्री अडचणीत, तपास करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश
फिनीशर धोनीला ‘या’ खेळाडूने रोखले, शेवटच्या 6 चेंडूत करून दिल्या नाहीत 27 धावा,