Share

‘…तर आई बनणं होतं कठीण’ सोनम कपूरने स्वतःच केला गंभीर आजाराचा खुलासा

बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री सोनम कपूर लवकरच आई होणार आहे. कपूर घराण्यात येणाऱ्या या नव्या पाहूण्याची सर्वजण आतूरतेने वाट पाहत आहेत. डॉक्टरांच्या माहितीनुसार, सोनम कपूर चार महिन्यांची गरोदर आहे. येत्या ऑगस्ट महिन्यात सोनमची प्रसूती होऊ शकते. परंतु सांगण्यात येत आहे की, सोनमने गरोदर राहण्याच्या पूर्वी एका भयंकर आजाराचा सामना केला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, सोनम कपूरला PCOS हा आजार होता. हा एक असा आजार आहे ज्यात गर्भधारणा होणे कठीण असते. यावर अनेक उपचार प्रक्रिया केल्यानंतर महिलाचे आई होण्याचे चान्सेस असतात. यात प्रचंड वेदना त्रास सहन करावा लागतो. सोनमने देखील या सर्व गोष्टी सहन केल्या आहेत.

याची माहिती तिने स्वतः इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करुन दिली आहे. यामध्ये तिने या आजाराशी कसा सामना केला. यावेळी आहारात काय घेतले हे सांगितले आहे. सध्या मी फक्त ताज्या आणि हंगामी गोष्टी खात असल्याची माहिती सोनमने पोस्टमध्ये दिली आहे.

सोनमचा एक व्हिडिओही मध्यंतरी सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. यात ती कोकोनट योगर्टसोबत मूठभर बेरी खात असल्याचे दिसत होते. तसेच मी फक्त एक वाटी हिरव्या भाज्यांसोबत पुदिना किंवा ग्रीन टी घेत असल्याची माहिती सोनमने यावेळी दिली होती.

याचबरोबर, PCOS बरा करण्यासाठी रिफाइंड शुगर पूर्णपणे बंद केल्याचे सोनमने सांगितले होते. वैद्यकीय तज्ज्ञ सुध्दा पीसीओएसच्या बाबतीत खुप काळजी घेण्यास सांगतात. यात डॉक्टरांनी दिलेल्या सर्व नियमांचे पालन करणे गरजेचे असते. या आजारात वैद्यकिय उपचारासोबत आहारही व्यवस्थित ठेवावा लागतो.

त्यामुळे या आजाराची माहिती देताना स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. अर्चना नरुला यांनी PCOS च्या महिलांना सल्ला दिला आहे की, सर्वप्रथम तुम्ही हार्मोनल तपासणी करून घ्या आणि त्यांच्या शरीरात कोणते हार्मोन असंतुलन झाले आहे हे जाणून घ्या. जर तुम्हाला पीसीओएस बरा करून गरोदर राहायचे असेल तर तुम्ही तुमची जीवनशैली बदला आणि वजन जास्त असल्यास ते कमी करा.

यानंतर त्यांनी, तळलेले अन्न खाणं बंद करा. जेवणात भात, मैद्याचे पदार्थ खाणं बंद करा. आपल्या आहारात हिरव्या भाज्या, धान्य आणि फळांचा समावेश करा. असा देखील सल्ला PCOS च्या महिलांना दिला आहे. सध्या PCOS च्या आजारातून सोनम पूर्ण बरी झाली आहे. मात्र तरी देखील तीच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या
स्वरा भास्करसोबत कॅब चालकाचं विचित्र कृत्य, अभिनेत्रीनं ट्विट करत सांगितला धक्कादायक घटनाक्रम
सैफ आणि अमृताच्या संसारात सारा ठरली मिठाचा खडा? सैफ अली खानने सांगितलं घटस्फोटामागचं कारण
टाटाच्या ‘या’ शेअर्सने दिला गुंतवणूकदारांना जबरदस्त रिटर्न; 11 दिवसांपासून धरला आहे रॉकेट स्पीड
पाताळ लोक! जमीनीत ३ हजार फुट खोलवर आहे ‘हे’ गाव, तेथील लोकांचे राहणीमान वाचून अवाक व्हाल

ताज्या बातम्या बाॅलीवुड

Join WhatsApp

Join Now