Share

‘मी रेकॉर्डींग रूममध्ये गेले, तेव्हा…,’ ‘अहो शेठ लय दिसान झालीया भेट’ सोनाली सोनावणेनी सांगितला किस्सा

sonali

अलीकडे सोशल मिडियावर सध्या अनेक गाणी व्हायरल होतं आहे. त्यात सध्या एक लावणीने आपल्याला वेड लावलं आहे. त्या लावणीच नाव म्हणजे  ‘अहो शेठ लय दिसान झालीया भेट’. ही लावणी कानी पडताच अगदी लहान मुलांपासून ते वृद्ध नागरिकांपर्यंत अनेकांचे पाय थिरकतात.

या लावणीने सोशल मिडियावर धुमाकूळ घातला आहे. तसेच लग्नसराई सुरू असल्याने वरातीत देखील या लावणीने तरुणांना वेड लावलं आहे. ही लावणी प्रसिद्ध गायिका सोनाली सोनावणे (Sonali Sonawane) हिने आपल्या हटके आवाजात गायली आहे. लावणी इतकीच चर्चा सध्या सोनालीची देखील सुरू आहे.

आतापर्यंत सोनालीने अनेक गाणी गायली आहे. सोनालीच्या प्रत्येक गाण्याला तुफान प्रतिसाद मिळाला आहे. ‘माझी बाय गो’, ‘मी नादखुळा’, ‘पिरतीचं गाव’, ‘पोरी तुझे नादानं’ अशी तिने गायलेली कित्येक गाणी बऱ्याच म्युझिक प्लॅटफॉर्मवर ट्रेंडीग आहेत. विशेष बाब सोनालीने पहिल्यांदाच लावणी गायली आहे.

तिने गायलेल्या ‘अहो शेठ लय दिसान झालीया भेट’ या पहिल्याच लावणीने 10 मिलीयन व्ह्यूजचा टप्पा पार केला आहे. सध्या सोनालीवर कौतुकाचा वर्षाव होतं आहे. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना सोनालीने याबाबत सांगितलं आहे. तसेच रेकॉर्डींग रूममधील एक किस्सा देखील तिने सांगितला आहे.

वाचा लावणीच्या या अफाट प्रसिद्धीबद्दल सांगताना सोनालीने काय म्हंटलं आहे. ‘अहो शेठ’ ही माझी पहिलीच लावणी आहे. बऱ्याच दिवसांपासून माझी लावणी गायची इच्छा होती, असं सोनालीने म्हंटलं आहे. याचबरोबर लहानपणापासून नृत्य आणि गायनाची आवड असल्याच देखील तिने सांगितलं आहे.

पुढे सोनालीने सांगितलं की, ‘लावणी हा प्रकार वेगळा असल्याने लावणी गाणं हे अतिशय कठीण असतं. ‘अहो शेठ’ ही लावणी गाण्यासाठी मी रेकॉर्डींग रूममध्ये गेले, तेव्हा फारच उत्सुक होते. त्यानंतर लावणी गाताना माझ्यात एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा आली, असं तिने सांगितलं आहे.

दरम्यान, ‘मी गाणं रेकॉर्ड करून कंपोझरला पाठवलं. विशेष बाब म्हणजे पहिल्याच प्रयत्नात म्युझिक कंपोझर नसतानाही माझं गाणं त्यांना आवडलं. हीच माझ्यासाठी पोचपावती असल्याच सोनालीने म्हंटलं आहे. या लावणीला मिळालेला प्रतिसाद पाहून स्वप्नपूर्ती झाल्यासारखं वाटतं, असं म्हणत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या
शरद पवारांनी आतापर्यंत ५ वेळा माफी मागितली असती; राज ठाकरेंना विरोध करणाऱ्या युपीतील खासदाराचे वक्तव्य
पुणेकरांनो सावधान! पुणे रेल्वे स्टेशनवर बॉम्बसदृश वस्तू आढळल्याने खळबळ; वाचा नेमकं घडलं काय?
हेमा मालिनीला सोडून शबाना आजमीसोबत रोमँटिक अंदाजात दिसले धर्मेंद्र, वाचा काय आहे प्रकरण
धर्मवीर चित्रपट वादात; समरेणूच्या दिग्दर्शकाने केले गंभीर आरोप, मराठी सिनेसृष्टीत खळबळ

इतर ताज्या बातम्या मनोरंजन राज्य

Join WhatsApp

Join Now