सध्या मनोरंजन क्षेत्राने खूप प्रगती केलेली आहे. अनेक नवनवीन कलाकार या क्षेत्राकडे वळत आहे. बॉलीवूडप्रमाणे मराठी चित्रपटासृष्टी देखील सध्या यशाच्या शिखरावर आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार देखील आता मागे राहिले नाहीत. या कलाकारांनी देखील आपल्या अभिनयाच्या जोरावर आपले स्थान निर्माण केले आहे.
याच मराठी चित्रपटसृष्टीतील एक अभिनेत्री अशी आहे जिने आपल्या सौंदर्याने आणि अदाकारीने चाहत्यांना वेड लागले आहे. तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी चित्रपटसृष्टी स्थान निर्माण केले. ही अभिनेत्री म्हणजे अभिनेत्री सोनाली कुलकर्णी. सोनालीने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. तिने कमी कालावधीत चाहत्यांच्या मनावर राज्य करायला सुरुवात केली. ही यशाची कारकीर्द गाठल्यानंतर सोनालीने लग्न केले
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे लग्न मे २०२१ मध्ये झाले. सोनालीने कुणाल बेनोडेकर सोबत सात फेरे घेतले. सोनालीने काही दिवसांपूर्वी एक फोटो शेअर केला. हा फोटो मकर संक्रांतीचा आहे. खरंतर सोनालीची ही लग्नानंतरची पहिली मकर संक्रांत आहे. हा फोटो सोनालीने सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केला आहे.
या फोटोमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. तिने काळया रंगाची साडी घातली असून त्यावर हलव्याचे दागिने देखील घातले आहेत. या लूकमध्ये ती अजूनच सुंदर दिसत आहे. तर तिच्या सोबत पती कुणाल आणि सासू सासरे देखील दिसत आहे. हा फोटो दुबईतील आहे. सध्या सोनाली तिच्या परिवारासोबत दुबईमध्ये आहे. या फोटोवर चाहत्यांनी लाइक्ससह कमेंट देखील केल्या आहे.
सोनालीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, तिने ‘बकुळा नामदेव घोटाळे’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. यानंतर तिने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहे. ‘नटरंग’ या चित्रपटात तिने मुख्य भूमिका केली. त्याचबरोबर या चित्रपटातील ‘अप्सरा आली’ हे गाणं देखील खूप गाजले होते. त्याचबरोबर ‘क्षणभर विश्रांती’, ‘अजिंठा’, ‘मितवा’, ‘सिंघम २’, ‘गोष्ट लग्नानंतरची’,‘ रमा माधव’, ‘क्लासमेंट्स’, ‘पोस्टर गर्ल’, ‘हिरकणी’, ‘झिम्मा’ अशा अनेक चित्रपटात सोनालीने काम केले आहे.
त्याचबरोबर काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा ‘पांडू’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात भालचंद्र उर्फ भाऊ कदम आणि कुशल बद्रिके देखील मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाला महाराष्ट्राकडून मोठ्या प्रमाणात प्रेम मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या
…अन् अकरा वर्षीय मुलाच्या जीवनाची दोरच तुटली; वाचा पतंग उडविताना नेमकं असं घडलं तरी काय?
…म्हणून BCCI ने लता मंगेशकरांसाठी स्टेडियममध्ये दोन सीट कायम राखीव ठेवल्या होत्या
पुण्यातील सारसबागेसमोर एक आजीबाई मागत होत्या भीक, चौकशीदरम्यान समोर आले वेगळेच सत्य
तारक मेहता मधील बबिताला अटक, चार तास कसून चौकशी केल्यानंतर पोलिसांनी…